नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार अलसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जेटली यांना गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होत आहे. त्यामुळे सोमवारी त्यांना कार्यालयातही जाता आलं नाही. त्यांनी स्वत:च याबाबत गुरुवारी ट्विट करुन आपण मूत्रपिंड विकारानं त्रस्त असल्याचं सांगितलं होतं. निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.
आज त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया केली जाणार आहे.. मूत्रपिंड दात्याशी संबंधित प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. जटली हे पुढील आठवड्यात दहाव्या भारत-ब्रिटन आर्थिक आणि वित्तीत वार्ता परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय.