भरलग्नमंडपात नवरीचा लग्नासाठी नकार; नवरदेवावर गुन्हा दाखल, जाणून घ्या नक्की काय झालं...

'माझ्या कुटुंबासोबत असा व्यवहार केला, तर लग्न झाल्यानंतर माझ्यासोबत....'

Updated: Aug 7, 2021, 08:27 AM IST
भरलग्नमंडपात नवरीचा लग्नासाठी नकार; नवरदेवावर गुन्हा दाखल, जाणून घ्या नक्की काय झालं... title=

मुंबई : सध्या लग्नमंडपातील अनेक किस्से समोर येत आहेत. आता देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेवाकडच्या पाहुण्यांनी मोठ्या उत्साहात हवेत गोळीबार केला. या गोळीबारात नवरीचे काका जखमी झाले. या दुर्घटनेनंतर बुधवारी रात्री ईरम आणि शाहजाद यांचं लग्न अखेर रद्द झालं. ईरम म्हणाली, 'मी त्या मुलासोबत लग्न कशी करू शकते. ज्याने माझ्या कुटुंबासोबत असा व्यवहार केला. लग्न झाल्यानंतर मी त्याच्या घरी एकटी कशी राहू. तेव्हा तो माझ्यासोबत कसा व्यवहार करेल. '

नवरीच्या निर्णयानंतर कुटुंबाने नवरदेवाची गाडी तोडली. शिवाय नातेवाईकांना मारहाण देखील केली. घटनेची माहिती मिळताचं पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रात आणली. पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे सध्या मुलीच्या काकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना प्रकृती आता स्थिर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी  चालविणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. नवरदेव आणि त्याचे भाऊ पप्पू आणि सोनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.