पाकिस्तान घाबरला; सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने सीमारेषेवर विमानांची गस्त वाढवली

तेव्हापासून सीमारेषेवर पाकिस्तानी विमानांची गस्त वाढली आहे. या विमानांच्या ताफ्यात एफ-१६ , जेएफ-१७ यासारख्या अत्याधुनिक विमानांचा समावेश आहे. 

Updated: May 10, 2020, 01:19 PM IST
पाकिस्तान घाबरला; सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने सीमारेषेवर विमानांची गस्त वाढवली title=

नवी दिल्ली: काश्मीरच्या हंदवाडा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्यदलातील कर्नल आशुतोष वर्मा यांच्यासह भारताचे चार जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पुन्हा सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करेल की काय, अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानच्या विमानांची गस्त वाढली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, हंदवाडा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळीही पाकिस्तानमध्ये हवाई कसरती झाल्या होत्या. भारताकडे याची पक्की माहिती आहे. हंदवाडा चकमकीत भारताचा कर्नल दर्जाचा अधिकारी शहीद झाल्यानंतर पाकिस्तानची धास्ती आणखीनच वाढली. तेव्हापासून सीमारेषेवर पाकिस्तानी विमानांची गस्त वाढली आहे. या विमानांच्या ताफ्यात एफ-१६ , जेएफ-१७ यासारख्या अत्याधुनिक विमानांचा समावेश आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या या हालचालींवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. 

काश्मीरमध्ये ओलिसांची सुटका करताना चार भारतीय जवान शहीद

हंदवाडा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने ट्विट करून यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, भारताकडून खोटेनाटे सांगून पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी कारवाई होऊ शकते, अशी भीतीही इम्रान खान यांनी बोलून दाखवली होती. 

हंदवाडा चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मा होते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ

त्यामुळेच भारताचा संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी पाकिस्तानने सीमारेषेवर विमानांची गस्त वाढवल्याचे सांगितले जाते. यापूर्वी भारताने उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने एअर स्ट्राईक करून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता.