Father Son Emotional Video : बाप-लेकाचा 'तो' भावनिक क्षण; Video पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

सर्वसाधारण कुटूंबात माय लेकाचं नेहमीच पटतं असतं, मात्र बाप-लेकाचं पटत नसल्याची अनेक उदाहरण आपण पाहिले असतीलच. 

Updated: May 23, 2022, 02:09 PM IST
Father Son Emotional Video : बाप-लेकाचा 'तो' भावनिक क्षण; Video पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही   title=

मुंबई : सर्वसाधारण कुटूंबात माय लेकाचं नेहमीच पटतं असतं, मात्र बाप-लेकाचं पटत नसल्याची अनेक उदाहरण आपण पाहिले असतीलच. मात्र हा व्हिडिओ त्या नात्याला अपवाद ठरताना दिसतोय. बाप-लेकामधला हा भावनिक क्षणाचा हा व्हिडिओ पाहून संपूर्ण सोशल मीडियावर हळहळतोय.  

IAS अवनीश शरण यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकता की, एका गावात एका झोपडीसमोर एक जुनी सायकल उभी आहे आणि एक माणूस सायकलला हार घालून पूजा करताना दिसतोय. दुसरीकडे, एक मूल आनंदाने टाळ्या वाजवत उड्या मारताना दिसतोय.  

मुलाचा टाळ्या वाजवतानाचा आनंद पाहून ही जुनी सायकल त्यांच्या कुटुंबासाठी किती महत्त्वाची, हे समजतेय. या वडिलांसाठी ही सायकल किती महत्त्वाची आहे? हे फक्त त्या बाप-लेकालाच माहितीय. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या हृदयाला भिडलाय. अनेकांच्या डोळ्यात हा व्हिडिओ पाहून आनंदाश्रू आले आहेत. 

अवनीश शरण यांनी 'ही फक्त सेकंड हँड सायकल आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. त्याचे भाव सांगतात, त्याने नवीन मर्सिडीज बेंझ घेतली आहे, असे कॅप्शन लिहलीय. सोशल मीडियावर आतापर्यंत सुमारे 2 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.