Crime News : बाप म्हणावं की सैतान? बायको सोडून गेली म्हणून पोटच्या लेकीसोबतच...

या नराधम पित्याने आपल्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे की पोलिसही हैराण झाले आहेत. 

Updated: Feb 5, 2023, 05:35 PM IST
Crime News :  बाप म्हणावं की सैतान? बायको सोडून गेली म्हणून पोटच्या लेकीसोबतच...  title=

West Bengal Crime News : नवरा बायकोमधील वादाचा आणि भांडणाचा परिणाम मुलांवर होते. यामुळे बऱ्याचदा मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक मुलांवर अन्याय देखील होतात. अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) घडली आहे. बायको सोडून गेली म्हणून एका जन्मदात्या पित्याने आपल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरच अत्याचार केला आहे (Father rapes daughter). या पित्याचे कृत्य पाहून याला बाप म्हणावं की सैतान असा प्रश्न पडला आहे. या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे (Crime news). 

पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूरमधील खरगपूर भागात ही माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली आहे. बायको घरात नसताना एका नराधम पित्याने आपल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धक्कादायक कृत्य केले आहे. ही घटना खरगपूरच्या पिंगला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलचक परिसरातील तिलदागंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नातेवाईक आणि पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. यामुळे आपल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला नवऱ्याजवळ सोडून ती आपल्या माहेरी गेली होती. बायको घरात नसताना या पित्याची नजर फिरली.  मुलीची काळजी घेण्याऐवजी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे घेण्याची धमकी या नराधम पित्याने मुलीला दिली होती. यामुळे ही मुलगी खूपच भयभित झाली होती.

पीडीत मुलीची आई तिला भेटायला आली असता हा प्रकार उघड झाला. मुलगी तणावात असल्याचे या महिलेला जाणवले. मुलीची तब्येत खालावल्याचे तिच्या लक्षात आले. मुलगी नीट जेवत नसल्याने तिला थकवा आला होता. ती शाळेत जात नव्हती. आईच्या प्रश्नााना ती नीट उत्तर देत नव्हती. यामुळे तिच्या आईने खोदून खोदून विचारल्यानंतर यामुलीने नराधम पित्याचे कृत्य आईला सांगितले. यानंतर या महिलेने मुलीला घेवून थेट पोलिस ठाणे गाठले आणि नवऱ्याविरोधता तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ या नराधम पित्याला अटक केली.