मुंबई : बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. एक ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करत होता. त्यावेळी एका रिक्षेतून बाळ रस्त्यावर पडलं. रस्त्यावरून वेगानं गाड्या जात होत्या. त्यावेळी जे घडलं ते पाहुन तुम्हीही हैराण व्हाल. नक्की काय घडलं त्या ठिकाणी चला पाहुयात. (fact check viral polkhol traffic police save child video viral on social media)
रस्त्यावरून वेगानं गाड्या चालल्या होत्या. त्यावेळी रिक्षा टर्न घेत असताना अचानक आत बसलेल्या आईच्या मांडीवरून लहान बाळ रस्त्यावर पडतं. आता पुन्हा एकदा पाहा. किती भयानक प्रकार घडलाय. ही रिक्षा वेगानं चालली होती. त्यावेळी बाळ रस्त्यावर पडतं.
आजूबाजून वेगानं गाड्या चालल्या होत्या. ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करत होता. त्याचवेळी या ट्रॅफिक पोलिसाचं लक्ष बाळाकडे जातं. आणि समोरून वेगानं येणाऱ्या बसला हा ट्रॅफिक पोलीस थांबवतो. किती भयानक प्रसंग घडलाय पाहा.
दोन ते तीन सेकंद जरी उशीर झाला असता तरी इथे मोठा अनर्थ घडला असता. पण, या ट्रॅफिक पोलिसाने जीव धोक्यात घालून ही गाडी थांबवली आणि या मुलाचे प्राण वाचवले. सुदैवाने या घटनेत बस चालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने ट्रॅफिक पोलीस आणि सोबत लहान बाळ दोघे सुखरूप आहेत.
अनेकदा वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी म्हटलं की तो लाच घेणार, असा समज असतो. पण सगळेच पोलीस तसे नसतात. काही जण आपल्या कामामुळे आणि स्वभावामुळे जगापेक्षा वेगळे ठरतात. अशाच या ट्रॅफिक पोलिसाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतंय. सुंदरलाल असं वाहतूक पोलिसाचे नाव असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.