Fact Check: भारतीय खेळाडू ऋषभ पंतचा (Risha काल सकाळी म्हणजे शुक्रवारी भीषण अपघात झाल आहे. याच पार्श्वभुमीवर काल त्याचा अपघात झाल्यानंतर मात्र लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी त्यांच्या जवळ असलेले सामान आणि पैसे लोकांनी चोरले आहेत आणि त्याचे जखमी अवस्थेतील फोटो काढले आहेत अशी बातमी काल दुपारी वेगानं पसरली होती परंतु आता त्यांच्या जवळ असलेलं सामान आणि पैसे सुखरूप असून त्याचे सामान कोणीही लुबाडले नाही अशी बातमी समोर येते आहे. तेव्हा पोलिसांनी याबद्दल तसं ट्विट केलं आहे. सध्या या ट्विटचा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. तेव्हा जाणून घेऊया या बद्दलचा सविस्तर रिपोर्ट काय आहे. या व्हिडीओतून पोलिसांनी सत्य सांगितले आहे आणि त्याचे सामान सुखरूप आहे व खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहन त्यांनी या ट्विटच्या पोस्टमध्ये केले आहे. (fact check haridwar ssp statement does people really stole rishabh pants money and luggage what is the truth)
ऋषभच्या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवा येयला सुरू झाल्या होत्या. या अपघातानंतर ऋषभचं सामान काही अज्ञात लोकांनी लुटलं असल्याच्याही बातम्या येयला सुरूवात झाली होती. परंतु हा दिशाभूल करणारा संदेश असल्याचे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आले आहे. हा व्हिडीओ आयपीएस अशोक कुमार यांनी ट्विटरवर (IPS Ashok Kumar Tweet) पोस्ट केला आहे. हरिद्वार पोलिसांनी याबद्दलचं सत्य समोर आणण्याची माहिती कळते आहे. ऋषभ पंतसोबत झालेल्या या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवांचा (Fact check) बाजार तापला होता. रस्ता अपघातानंतर क्रिकेटपटू ऋषभ पंतचे सर्व सामान अज्ञात व्यक्तींनी लुटल्याचा हा दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हायरल केला होता. हरिद्वार पोलिसांनी आता या तथ्यांचा इन्कार केला आहे. एसएसपी अजय सिंह यांनी स्पष्ट केले की काही चॅनेल आणि पोर्टलवर असे सांगितले गेले आहे की ऋषभचे काही सामान लुटून काही लोकांनी नेलं आहे तर हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे.
रुग्णालयात प्राथमिक उपचारादरम्यान ऋषभ पंतने स्वत: सांगितले की, बॅग (सूटकेस) व्यतिरिक्त कारसह त्याचे सर्व सामान जळून खाक झाले. हरिद्वार पोलिसांनी ती सुटकेस आणि घटनास्थळावरून मिळालेली रोख रक्कम, ब्रेसलेट आणि चेन ऋषभ पंतच्या आईला ऋषभच्या समोरच्या हॉस्पिटलमध्ये सुपूर्द केली.
— Ashok Kumar IPS (@AshokKumarIPS) December 30, 2022
टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. उत्तराखंडमध्ये पंत यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली नंतर डिव्हायडरला धडकल्यानं त्याच्या कारनं पेट घेतला. अपघातानंतर ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतच्या पायाला आणि डोक्याला खूप दुखापत झाली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही (cctv footage rishbh pant car accident) सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. त्याच्या गाडीचा वेग हा साधारण ताशी 200 किमी असा होता.