Fact Check : केंद्र सरकारचा बेरोजगारांना मोठा दिलासा, दरमहा मिळणार 6 हजार रुपये

केंद्र सरकार 'पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेनुसार'  दरमहा तरुणांना 6 हजार रुपये देत आहे, असा दावा व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) मेसेजमध्ये करण्यात येत आहे.

Updated: Oct 29, 2022, 03:45 PM IST
Fact Check : केंद्र सरकारचा बेरोजगारांना मोठा दिलासा, दरमहा मिळणार 6 हजार  रुपये title=

Govt Unemployment Allowance : केंद्र सरकारकडून (Central Government) विविध योजना चालवल्या जातात. या योजनांद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली जाते. मात्र  सायबर क्राईम (Cyber Crime) करणारे काही अपप्रवृत्ती वेळोवेळी सरकारी योजनांबाबत खोटी माहिती देत फेक मेसेज (Fake Message) व्हायरल करतात. अशाच प्रकारे सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. (fact check central government will given 6 thousand ruppes per month to unemployed youth know what truth what false)
 
केंद्र सरकार 'पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेनुसार'  दरमहा तरुणांना 6 हजार रुपये देत आहे, असा दावा व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) मेसेजमध्ये करण्यात येत आहे.  जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर सावध रहा. सरकारद्वारे याबाबत ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. 

दरमहा मिळणार 6 हजार रुपये?   

व्हायरल मेसेजमध्ये बेरजगारांना दरमहा 6 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी सुरु झाल्याचंही दावा केला गेलाय. तसेच नोंदणी करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितलं जात आहे.

काय खरं काय खोटं? 

दरम्यान या व्हायरल मेसेजची पीआयबीने पोलखोल केली आहे. पीआयबीने ट्विट करत या मेसेजची तथ्य तपासणी केली जात आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीच योजना सुरु नसल्याचं पीआयबीने ट्विट केलं आहे. अशा फेक मेसेज व्हायरल करु नका आणि बळी पडू नका असं आवाहन पीआयबीने केलं आहे. पीआयबी व्हायरल होणाऱ्या मेसेजची तथ्य पडताळणी करते.