Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

Mobile Radiation Cancer: लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची (Viral Massage) सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 

Updated: Jun 7, 2023, 12:25 AM IST
Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक? title=
Fact Check, Viral Massage

Viral Massage Fact Check: सोशल मीडियाचा आवाका वाढल्यानंतर अनेक फेक न्यूज (Viral Fake News) आणि फेक मॅसेजेच दररोज हजारोंच्या पटीने व्हायरल होत असतात. त्यातील काही मॅसेजेस तुमच्यावर थेट परिणाम करतात. मॅसेजवर व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर गंभीर दावे देखील केले जातात. अशातच एक मॅसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. व्हायरल मॅसेज मागे दावा आहे की, मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार होऊ शकतो. हा दावा केल्यानं सगळ्यांचीच चिंता वाढलीये. हा दावा आरोग्याशी निगडीत आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 

WHO च्या म्हणण्यानुसार, मोबाईलमधून आरएफ रेडिएशन (Mobile Radiation) निघत असतं. हे रेडिएशन मेंदूच्या कॅन्सरला आमंत्रण देतो. बाजूला मोबाईल ठेवून झोपल्याने रेडिएशन मानवी शरीरासाठी धोकादायक असतात. डोकं दुखणे, चीडचीड होणे असे प्रकार वाढतात.

व्हायरल मॅसेजमागील दाव्याची पडताळणी केली असता. प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने याची माहिती सगळ्यांना मिळायला हवी. त्यामुळे झी 24 तासचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले आणि त्यांच्याकडून या दाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात...

मोबाईल जवळ ठेऊन झोपू नये. रेडिएशनमुळे कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखी, झोप नीट न होणे, चीडचीड होऊ शकते. त्याचबरोबर मानसिक आजारावर देखील मोठाप परिणाम होतो. रेडिएशनमुळे शरीरातील मांसपेशी दुखतात. त्याचबरोबर लैंगिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा - Chanakya Niti: नवविवाहित नवऱ्याने 'या' गोष्टी लक्षातच ठेवाव्यात; बायको होईल खुश अन्...

दरम्यान, झोपताना फोन जवळ ठेवू नये, त्याने कॅन्सरचा धोका वाढतो, हे स्पष्ट झालं. मात्र, सगळेच फोन वापरतात. त्यामुळे झोपताना किती दूर फोन ठेवावा हे देखील आम्ही जाणून घेतलं. त्यावेळी किमान 3 फूट फोन दूर ठेवायला हवा असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल वापरताना काळजी घ्या आणि रोगाला लांब ठेवून तुमचं आयुष्य ठणठणीत ठेवा.