मुंबई : थर्मासचा वापर आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. यामध्ये जर तुम्ही गरम पाणी ठेवाल, तर ते पाणी बराच काळ गरम राहाते. तसेच जर तुम्ही यामध्ये थंड पाणी ठेवाल तर ती, बराच काळा थंड देखील राहाते. या बॉटलचा वापर अनेक लोक चहा किंवा सूप गरम ठेवण्यासाठी देखील वापरतात. या पाण्याच्या बॉटलला किंवा भांड्याला आपण थर्मस म्हणतो. परंतु तुम्हाला माहितीय का, की 'थर्मस' हे तर अशाप्रकारच्या बॉटल बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे. परंतु या अशा बॉटलला नक्की काय म्हणतात?
इतके दिवस थर्मासला आपण थर्मासच बोलत आलो आहोत आणि अचानक तुम्हाला आज कळलं की, या बॉटलला थर्मास म्हणत नाहीत. तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागची संपूर्ण कहाणी.
विशेष काचेचे प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीचे नाव 'थर्मास' आहे आणि 'या' कंपनीमुळे याला बाटलीला थर्मास असे नाव पडले आहे. हे जसे डिटर्जंट पावडरला सर्फ, बॅकहोल्डरला जेसीबी, फोटो कॉपीला झेरॉक्स, टुथपेस्टला कोलगेट म्हणतात त्याच प्रकारे आहे.
सन 1892 मध्ये, स्टोटिश शास्त्रज्ञ सर जेम्स देवल यांनी प्रथम हे तयार केले होते. यावेळी त्यांनी या स्पेशल फ्लास्कमध्ये तापमान राखण्यासाठी केमिकलचा वापर केला होता. ज्यानंतर त्याचे फायदे लक्षात घेता तो खूपच लोकप्रिय झाला आहे.
थर्मास कंपनी 'या' खास प्रकारच्या बाटल्या आणि जेवणाचे डबे बनवण्यासाठी ओळखली जाते. ज्यामध्ये अन्न किंवा पाणी गरम अथवा थंड राहाण्यास मदत करते.
पूर्वी ही अमेरिकन कंपनी होती, जी जपान्यांनी विकत घेतली. आता या कंपनीशी संबंधित आणखी अनेक कंपन्या आहेत, पण ही एक मूळ कंपनी आहे.
आता प्रश्न असा आहे की असा आहे की, थर्मास कंपनीचं नाव आहे. तर या बाटलीला किंवा भांड्याला काय म्हणतात? तर अशा प्रकारच्या भांड्याला वॅक्युम फ्लास्क म्हणतात किंवा याला फक्त फ्लास्क देखील म्हटले जाते.