आकाश हा निळ्या रंगाचा का असतो? यामागील कारण फरच रंजक

पृथ्वीवरुन निळ्या रंगाचे आकाश दिसते, मग मंगळावरुन कोणत्या रंगाचे आकाश दिसत असेल, तुम्हाला माहितीय?

Updated: Jul 1, 2022, 09:05 PM IST
आकाश हा निळ्या रंगाचा का असतो? यामागील कारण फरच रंजक title=

मुंबई : तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, जेव्हा आकाशात ढग दिसत नाहीत, तेव्हा आकाश हे निळ्या रंगाचे दिसते. परंतु अकाश हे निळ्याच रंगाचे का दिसते? किंवा त्याचा नक्की खरा रंग कोणता असावा? असा तुम्ही कधी विचार केलाय का? हा रंग हिरवा किंवा गुलाबी का दिसत नाही? तर याचं उत्तरामागे सायन्स आहे. चला तर मग याचं उत्तर जाणून घेऊ या.
हे प्रकाशामुळे घडते

'द सन' च्या रिपोर्टनुसार, प्रकाश पृथ्वीशी एका विशिष्ट प्रकारे संपर्कात येतो, त्यामुळे आकाश निळे दिसते. सूर्यप्रकाश वातावरणातील वायू कणांवर आदळल्याने ते इंद्रधनुष्याच्या सर्व रंगांमध्ये विखुरले जाते. हा परिणाम रेले स्कॅटरिंग म्हणून ओळखला जातो, ज्याला लॉर्ड रेले म्हणतात आणि हे  नाव त्या व्यक्तीच्या नावावर ठेवण्यात आले आहे, ज्याने याचा शोध लावला आहे.

प्रकाश उर्जेच्या लहरींच्या रूपात प्रवास करतो, या लहरी सूर्यप्रकाश विभक्त झाल्यावर सर्वत्र विखुरल्या जातात. 

खरंतर जेव्हा या लहरी विखुरल्या जातात, तेव्हा निळ्या प्रकाशाच्या लाटा इतर रंगांपेक्षा जास्त विखुरतात. त्यामुळेच आकाश आपल्याला निळा रंगाचा दिसतो.

जेव्हा सूर्य आकाशात असतो तेव्हा तो पांढरा दिसतो, जो त्याचा खरा रंग आहे, परंतु आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य लाल किंवा पिवळा दिसतो. कारण सूर्यप्रकाश आपल्या वातावरणाच्या जाड थरातून जातो, जो हिरवा आणि निळा प्रकाश पसरवतो.

आकाश लाल किंवा गुलाबी केव्हा होते?

आकाश लाल किंवा गुलाबी रंगाच्या विविध छटांमध्ये बदलताना पाहणे अगदी सामान्य आहे, परंतु काहीवेळा आकाश अधिक असामान्य रंगाचे असू शकते. ज्याचा आपण विचार देखील करत नाही. परंतु हे प्रकाशाच्या खेळामुळे घडते.

मंगळावर या रंगाचे आकाश दिसते

इतर ग्रहांचे वातावरण आपल्यासारखे म्हणजे पृथ्वी सारखे नसते आणि त्यामुळे तेथून वेगळ्या रंगाचे आकाश दिसते. उदाहरणार्थ, मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या जाडीच्या सुमारे एक टक्का आहे. परिणामी, आपल्या ग्रहावर जितका प्रकाश आहे तितका प्रकाश तेथे विखुरला जाणार नाही.

रॉयल म्युझियम ग्रीनविच वेबसाइटनुसार, मंगळावर खूप फिकट निळे आकाश असण्याची अपेक्षा आपण करू शकतो, परंतु हवेत राहणाऱ्या धुळीच्या धुकेमुळे मंगळावरील दिवसाचे आकाश अधिक पिवळे दिसते.

याचे कारण असे की मोठे धूलिकण लहान-लहरी निळा प्रकाश शोषून घेतात आणि बाकीचे रंग विखुरतात, ज्यामुळे मंगळावरील आकाश हा बटरस्कॉच रंगाचा दिसतो.