नवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

Husband Wife Fight :  लग्न म्हणजे विश्वास जर या विश्वालाच तडा गेला तर सगळ्या नात्यावरुनच विश्वासाला उडून जातो. समोरचा पूर्णपणे खचून जातो. असाच घात एका नवऱ्यावर झाला आहे. नवरा बायकोमध्ये तिसरा आला आणि मग...

Updated: Jan 17, 2023, 04:03 PM IST
नवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल title=
Extramarital affairs Husband Wife Fight love with husbands friend wife video got Husband Trending marathi news

Husband Wife News : विश्वास आणि प्रेमावर प्रत्येक नात टिकतं आणि फुलतं. लग्नामध्ये (wedding video) तर प्रेमासोबतच (Love) विश्वास खूप गरजेचा आहे. गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाच्या (Extramarital affairs) घटना वाढल्या आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर जीवनसाथी जास्त जवळचा असतो. त्यानंतर मित्रमंडळी...पण जेव्हा नवरा बायकोमधील एकतरी या नात्याला तडा देतो. त्यावेळी जगावरील विश्वास हरपतो. त्यातच जर नवरा बायकोमध्ये (Husband Wife) हा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याच मित्र असतो तेव्हा तर...असच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

त्या एका व्हिडीओने भानगड उघड

पती घराचा गाडा सांभाळण्यासाठी दिल्लीत (Delhi) राबत असताना इथे गावी पत्नी मात्र त्याला धोका देतं होती. ती दुसऱ्या तिसऱ्या कोणासोबत नाही तर पतीच्या मित्रासोबत तिचे प्रेम संबंध होते. एका ती त्या मित्रासोबत पार्कमध्ये फिरत होती. त्यावेळी कोणी तरी त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ त्या व्यक्तीने तिच्या नवऱ्याला पाठवला. हा व्हिडीओ पाहून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकते. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी तो दिल्लीहून थेट नवाडा काढतो. 

पत्नीचं धक्कादायक पाऊल 

पतीने या कृत्याबद्दल विचारलं असता, पत्नीने धक्कादायक पाऊल उचलं. पतीने जाब विचारल्यावर पत्नीने त्याला जोरदार मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीचं डोकं फुटलं. प्रेमाचं हे त्रिकोणी प्रकरण बिहारमधील नवादामधलं (navada) आहे. दरम्यान पतीवर या मारहाणीत गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या व्यक्तीचं नाव टिंकू कुमार आहे. 

दोघेही आपलेच कोणाबद्दल तक्रार करु...

टिंकूने सांगितलं की, 2014 मध्ये त्यांचं लग्न झालं त्यानंतर तो कामासाठी दिल्लीला गेला. बायको नवाडा गावीच होती. अशावेळी माझ्या मित्र करण मिस्त्री माझ्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत घरी जात होता. माझी बायको आणि माझा मित्र दोघेही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसारखं वागू लागले. अनेकदा एकत्र फिरायला जाऊ लागले. दरम्यान, पार्कमधील व्हिडीओमधून त्यांचं गुपित उघडं झालं. 

पती पुढे म्हणाला की, कोणाबद्दल तक्रार करु एक जिने मला सात जन्म साथ देण्याचं वचन दिलं होतं की ज्या जीवापाड मित्राची ज्याला कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सांगितलं होतं. हताश झालेल्या या पतीने आपल्या जीवाला धोका असून पोलिसांकडे सुरक्षेसाठी मागणी केली आहे.