नवरा बाहेर गेलाय, ये पटकन! नवविवाहितेचा बॉयफ्रेंडला फोन, ते दोघे बेडरुममध्ये असताना पती आला...

Extramarital affair : लग्नाला काहीच महिने झाले होते. नवरा बाहेर गेला ही संधी साधून तिने आपल्या प्रियकराला फोन करुन घरी बोलवून घेतलं. पण पती घरी आला अन् मग...

Updated: Jun 23, 2023, 03:50 PM IST
नवरा बाहेर गेलाय, ये पटकन! नवविवाहितेचा बॉयफ्रेंडला फोन, ते दोघे बेडरुममध्ये असताना पती आला... title=
Extramarital affair newly married wife boyfriend in bedroom husband caught red handed family shot the video

Extramarital affair News : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात. 

विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. एका नवविवाहित तिच्या बायफ्रेंडसोबत असताना नवऱ्याने त्यांना रंगेहात पकडलं. ही प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. 

झालं असं की, नवविवाहितचं लग्न 25 मे 2023 मध्ये झालं होतं. एकेदिवशी नवरा रात्रीच्या वेळी तिलकोत्सवासाठी घराबाहेर गेला. नवरा घरी नाही हीच संधी साधून तिने गावातील तिच्या प्रियकराला कॉल केला. नवरा घरी नाही तू लवकर ये...मग काय प्रियकर ताबतोड तिच्या घरी पोहोचला. (Extramarital affair newly married wife boyfriend in bedroom husband caught red handed family shot the video)

कोणाला शंका येऊन नये म्हणून अंधारातच विवाहितेच्या बेडरुममध्ये शिरला. पण अचानक काही कामानिमित्त नवरा घरी परत. त्याने दरवाजा ठोठावला, पण कोणीही दार उघड नव्हतं. त्याला शंका आली...बराच वेळाने पतीने घराचं दार उघडलं. नवरा घरात शिरला आणि त्याची नजर इकडेतिकडे काही तरी शोधत होती. 

पत्नीनेही आपण कपडे बदलत असल्याचा बहाणा करुन बेडरुमचे लाइट बंद केले. बराच उशीर झाला आहे आपण झोपायला हवं असं म्हणत तिने नवऱ्याला झोपण्यास सांगितलं. पत्नीच्या या वाक्याने त्याचा मनात शंका अजून वाढली. तो तडकाफडकी उठला आणि त्याने बेडरुमची लाइट लावली. 

त्याने नीट पाहिलं तर त्याला बेडरुममध्ये एक तरुण दिसला. त्याने कुटुंबातील सदस्यांना बोलवलं त्यांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि पोलिसांना फोन करुन बोलवून घेतलं. दरम्यान पोलिसांनी त्याचा पत्नीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी नवऱ्याला पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी समजवलं पण तो काही ऐकायला तयार नव्हता. 

अशा परिस्थितीत नवविवाहितेला पोलिसांनी तिच्या वडिलांच्या स्वाधीन केलं. मात्र प्रियकराला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं. दरम्यान माझ्या लेकीला नाहक या सगळ्यात कट करुन फसवल्याचा आरोप नवविवाहित तरुणीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान ही घटना बिहारमधील बक्सर या गावातील आहे.