Boyfriend Murder: दोघांचे लग्न झालं. सुखी संसार सुरु होता. अखेर या सुखी संसाराला नजर लागली. दोघांमध्ये भांडण झालं. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आयुष्याचे वेगळे मार्ग निवडले. या मार्गावरुन तिला एकटं चालणं शक्य नव्हतं. म्हणून तिने आधार घेतला फिरोजचा. प्रिती आणि फिरोजची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं प्रेमात. तिच्या अपेक्षा वाढल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही. मग यातून घडला क्रुर गुन्हा...
प्रितीचं दिपक यादव (Priti Yadav ) ( deepak Yadav) सोबत लग्न झालं होतं. लग्नाला चार वर्ष झाली होती. चार वर्षात अनेक वेळा दोघांमध्ये भांडणं झाली होती. रोजच्या भांडणाला वैतागलेल्या प्रितीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. प्रितीने दिपकचं घर सोडलं आणि दिल्ली गाठलं. दिल्लीत प्रितीची फिरोज नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रितीला आधाराची गरज होती तो आधार प्रितीला फिरोजच्या रुपाने मिळाला. प्रिती आणि फिरोज (Firoz love Priti) दोघे लिव्ह इन रिलेशनशिप (live in Relationship) राहू लागले. दोघेही प्रेमात अखंड बुडाले होते.
फिरोज एका सलूनमध्ये (saloon) कामाला होता. प्रितीने फिरोजकडे लग्नाची मागणी टाकली. प्रितीच्या मागणीकडे फिरोजने दुर्लक्ष्य केलं. हाळू हाळू प्रिती रोज लग्नाची मागणी करु लागली. या मागणीमुळे फिरोज वैतागू लागला. प्रितीची मागणी होती लवकरात लवकर लग्न करण्याची. मात्र फिरोजने ही मागणी धुडकावली. अखेर 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. प्रितीला प्रचंड राग आला. घरात ठेवलेला वस्तारा प्रितीने घेतला आणि थेट फिरवला तो फिरोजच्या गळ्यावर. घरात रक्ताचा सडा पडला. फिरोजने तडफडत प्राण सोडले (Murder). प्रितीला कळालं की, "आपल्या हातून मोठा गुन्हा घडला आहे"
या क्रूर गुन्ह्यातून पळ काढण्यासाठी प्रितीच्या डोक्यात एक प्लान शिजला. प्रितीने थेट मार्केट गाठलं. मार्केटमधून एक मोठी ट्रॉली बॅग विकत घेतली. घरी आल्यानंतर तिने त्या बॅगमध्ये फिरोजचा मृतदेह कोंबला आणि वाट पाहू लागली रात्रीची. रात्रीच्या किर्ररर काळोखात ती ट्रॉली बॅग ओढत रेल्वे स्टेशनकडे जाऊ लागली. कोणत्यातरी एका ट्रेनमध्ये बॅग ठेवून पळ काढण्याचा प्लान प्रितीने आखला होता.
काळोखात एक महिला भलीमोठी बॅग ताकदीने ओढत असल्याचं गस्त घालणाऱ्या पोलिसांना दिसलं. पोलीस आणि प्रितीची नजरा नजर झाली. प्रितीने लपण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली. पोलीस जवळ आले. पोलिसांनी विचारपूस करताच प्रितीची बोबडी वळाली. पोलिसांना बॅग उघडली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी तात्काळ प्रितीला अटक केली. पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे
ज्या वस्ताऱ्याने फिरोज रोजी रोटी कमवत होता. त्याच वस्ताऱ्याच्या मदतीने प्रेयसीने त्याचा जीव घेतला.
Extramarital affair Married Woman Killed Boyfriend in delhi