लैंगिक शोषणाचे वास्तव सांगतेय तरुणी, व्हिडिओ व्हायरल

आलीया नामक मुलीवर घडलेला प्रसंग जशास तसा वर्णन केला आहे. त्यामूळे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 6, 2017, 08:06 PM IST
लैंगिक शोषणाचे वास्तव सांगतेय तरुणी, व्हिडिओ व्हायरल title=

नवी दिल्ली : लैंगिक शोषणाच्या अनेक घटना दिवसागणिक समोर येतात. त्याहीपेक्षा उजेडात न आलेल्या घटना अधिक असतात. कारण धाडस करुन घडलेल्या घटनेला सामोरे जात वाचा फोडणारे फार कमीजण असतात. आफ्रिन खान नावाच्या तरुणीने आलीया नामक मुलीवर घडलेला प्रसंग जशास तसा वर्णन केला आहे. त्यामूळे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

आई कामानिमित्त बाहेर गेली असताना सावत्र वडिलांनी ११ वर्षाच्या आलियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तो स्पर्श जीवघेणा होता. आलिया अम्मा, अम्मा ओरडत होती. मदतीची याचना करत होती. आपण आईला सर्व घडलेला प्रसंग सांगू अशी धमकी देत होती. या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी त्यावेळी तिला तिच्या पहिल्या वडिलांची आठवण येत होती. जरी माझ्या तोंडातून अम्मा, अम्मा येत होते तरी माझ्या मनात अब्बा, अब्बा असेच होते असे ती सांगते. आलियासोबत घडलेली ती संपूर्ण घटना आफ्रिन या तरुणीने जशीच्यातशी कथन केली आहे. 

#MeToo या कॅम्पेनद्वारे घरात, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात वाचा फोडण्यात येत आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी  #MeToo या हॅशटॅग अंतर्गत समाजातील धक्कादायक वास्तव समोर आणले आहे.