लॉकडाऊनदरम्यान इंटरनॅशनल, कॉन्फरन्स कॉलमुळे वाढलं बिल? वाचा TRAIच्या महत्त्वाच्या सूचना

लॉकडाऊनच्या काळात..... 

Updated: May 11, 2020, 02:00 PM IST
 लॉकडाऊनदरम्यान इंटरनॅशनल, कॉन्फरन्स कॉलमुळे वाढलं बिल? वाचा TRAIच्या महत्त्वाच्या सूचना  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI ट्रायकडून सोमवारी एक महत्त्वाचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. ज्यामध्ये ऑनलाईन कॉन्फरन्स आणि एकंदरच ऑनलाईन सुविधांच्या वापराविषयीच्या काही सूचना देण्यात आल्या आहेत. 

ऑनलाईन ऑडिओ कॉल्स आणि कॉन्फरन्सच्या माध्यमाशी जोडलं गेल्यानंतर अवाजवी दराने वाढलेल्या बिलाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकाशी जोडलं असताही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. ज्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

ऑनलाईन कॉन्फरन्सशी जोडलं गेलं गेलं असता आणि आंतरराष्ट्रीय दुरध्वनीशी संपर्क साधला असता बिलाच्या दरांमध्ये झालेली वाढ निदर्शनास आणण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन कॉन्फरन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं लक्षात आलं. पण, आता मात्र ग्राहकांनी बिलांच्या दरांचे वाढते आकडे पाहता आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक, हेल्पलाईन नंबर आणि अमुक एका अॅपकडून निर्धारित केलेले दर जाणून घेणं आवश्यक असलल्याची सूचना ट्रायकडून देण्यात आली आहे. 

कोणती काळजी घ्याल? 

विविध स्तरावरील व्हिडिओ कॉल, कस्टमर केअर अर्थात ग्राहक तक्रार निवारणासाठीच्या .दूरध्वनीक्रमांकावर संपर्क साधण्यापूर्वी त्यासाठीच्या नियम आणि अटी एकदा लक्षपूर्वक वाचा. 

पैसे आकरण्याची अट असल्यास ते ग्राहक किंवा उपभोक्त्यांकडून आकारले जाणार आहेत की सर्व्हिस प्रोव्हायडरकडून भरले जाणआर आहेत हे लक्षात घ्या. 

 

लॉकडाऊन असल्या कारणांमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून इंटरनेट, ऑनलाईन कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉल, आंतरराष्ट्रीय स्तरांवर साधला जाणारा संपर्क आणि विविध सेवा पुरवल्या जाणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हाईडरच्या कस्टमर केअर दूरध्वनी क्रमांकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच धर्तीवर बिलाच्या दरांमध्ये आढळून आलेल्या तफावतीमुळे ट्रायने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.