मुंबई : उत्तर प्रदेश एटीएसनं निशांत अग्रवालला नेमकं कसं पकडलं, याविषयीची एक्सक्लुझिव्ह माहिती झी मीडियाच्या हाती लागली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या निशांत अग्रवालला एटीएसने सोमवारी ताब्यात घेतलं होतं.
1. काजल नावाच्या फेसबुक अकाऊंटद्वारे आयएसआयची महिला हस्तकाने देशाच्या सुरक्षा यंत्रणला भगदाड पाडलं.
2. डीआरडीओचे शास्त्रज्ञ आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान अच्युतानंदला हनीट्रॅपमध्ये अडकवलं.
3. सध्या आयएसआयच्या किमान १ हजार फेसबुक प्रोफाईल भारतीय गुप्तचर विभागाच्या रडारवर आहेत.
4. भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागानं पाकिस्तानच्या महिला आयएसआय हस्तकांची माहिती मिळवली.
5. काजल नावाची ही महिला एजंट १५ ते २० फेसबुक प्रोफाईलवर सक्रीय आहे.
एटीएसने अशी संपूर्ण माहिती मिळवत अमित अग्रवालला नागपुरातून ताब्यात घेतलं. अमितला पुढच्या चौकशीसाठी आता लखनऊत नेणार आहेत. आज उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधीपथकानं निशांत अग्रवालाला नागपूर न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं निशांतसाठी पोलिसांना तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे.
ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत उत्तर प्रदेश एटीएसनं सोमवारी त्याला अटक केली होती. रात्रभर चौकशी करुन आता त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. निशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस ऐरोस्पेसमध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करीत होता.
अमित अग्रवाल हा ४० जणांच्या टीमचे नेतृत्व करायचा. उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी बीएसएफचा जवान अच्युतानंद मिश्राला अटक केल्यावर निशांत अग्रवालचे नाव समोर आले.