UPSC Exam Calendar | क्लास वन अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; युपीएससीने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक

 संघ लोकसेवा आयोग(UPSC)ने 2021-2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे.

Updated: Aug 15, 2021, 12:57 PM IST
UPSC Exam Calendar | क्लास वन अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; युपीएससीने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक title=

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोग(UPSC)ने 2021-2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. आयोगाच्या परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवू इच्छिनारे उमेदरवार upsc.gov.in या संकेतस्थळावर येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बघू शकतात.

युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी कॅलेंडरच्यामते युपीएससी नागरी सेवा परीक्षेची सूचना फेब्रुवारी 2022 मध्ये जारी करण्यात येईल. परीक्षा 5 जून रोजी आयोजीत करण्यात येईल.

तसेच नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा 16 सप्टेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय 2021-22 मध्ये होणाऱ्या अन्य परीक्षांच्या तारखांबाबत सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

युपीएससीचे 2021-2022 चे वार्षिक कॅलेंडर कसे डाऊनलोड करावे
सर्वात पहिले अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अधिकृत वेबसाईटवर जाऊन एग्जामिनेशन लिंकवर क्लिक करावे
नवीन पेजवर वार्षिक कॅलेंडर दिसेल
या कॅलेंडरची प्रत डाऊनलोड करा