EPFO च्या 'हायर पेंशन'साठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? नोकरदार वर्गासाठी कामाची बातमी

EPFO Pension Rules: तुम्ही नोकरी करता का? पीएफ खात्यावर तुमचेही पैसे जामा होतायत का? ही बातमी नक्की वाचा... कारण ही वाढीव मुदत पुन्हा मिळेल याची शक्यता कमीच.   

सायली पाटील | Updated: Jun 27, 2023, 08:48 AM IST
EPFO च्या 'हायर पेंशन'साठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? नोकरदार वर्गासाठी कामाची बातमी  title=

EPFO Pension Rules: नोकरी करणाऱ्या अनेकांसाठीच त्यांच्या पगाराची आर्थिक गणितं, निवृत्तीवेतनासंदर्भातील तरतुदी, Variable Pay, विविध भत्ते आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तितकीच महत्त्वाची असते. कारण, कळत नकळत त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि गुंतवणुकीवरही याचे थेट परिणाम होत असतात. अशीच एक अत्यंत महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. नोकरदार वर्गासाठी ही माहिती अतिशय खास असण्यामागचं कारण म्हणजे Higher Pension चा पर्याय निवडण्यासाठीची मुदतवाढ. 

अधिकृत माहितीनुसार आता विविध संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी 11 जुलैपर्यंत अधिकच्या पेंशनसाठीचा अर्ज करु शकतात. अर्जासाठी मुदतवाढ देण्याची ही दुसरी वेळ असून, आतापर्यंत ज्यांनी कोणी हे बदल केले नसतील त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची Update आहे. याआधी 3 मे 2023 ऐवजी ही अंतिम तारीख 26 जून 2023 करण्यात आली होती. आता त्यातही आणखी मुदतवाढ देण्यात आली असून, पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख असेल 11 जुलै 2023. 

हेसुद्धा वाचा : Vegetable Price Hike : पावसामुळं भाज्यांचे दर कडाडले; टोमॅटो, मिरची जेवणातून गायब 

 

सर्वोच्च न्यायालयानं 4 नोव्हेंबर 2022 ला सुनावलेल्या निर्णयाची अंमसबजावणी करत सध्याचे लाभार्थी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनाही EPFO संदर्भातील अर्ज य़ानलाईन पद्धतीनं करण्यास सूचित केलं होतं. त्यासाठी 3 मे ही अंतिम तारीख होती. पण विविध स्तरांतून आलेल्या मागण्या लक्षात घेता हे प्रमाण वाढवून 26 जून 2023 करण्यात आलं होतं. त्यानंतर यात पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. 

हायर पेंशनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणं 

- हायर पेंशनचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथन ई सेवा पोर्टलला भेट द्या. 
- यानंतर पेंशन ऑन हायर सॅलरीवर क्लिक करा. 
- आता तुम्ही एका नव्या पेजवर याल, जिथं तुम्हाला दोन पर्याय दिसतील. 
- इथं 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्यांनी पहिला पर्याय निवडणं अपेक्षित असेल. 
- तर, तुम्हीही नोकरी करत असाल तर तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल. 
- आता तिथे UAN क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक अशी माहिती भरा. 
- आता तुमच्या आधार कार्डशी जोडल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल जो पोर्टलवर एंटर करा. 

पीएफ खात्यावरील Balance कसा तपासावा? 

EPFO Account Balance विविध मार्गांनी तपासता येतो. यामध्ये तुम्ही 9966044425 या क्रमांकावर मिसकॉल देऊन, 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवून, EPFO चं ऑनलाईन पोर्टल वापरून आणि UMANG अॅप वापरून अकाऊंटमधील रक्कम पाहू शकता. 

UAN वापरून कसा पाहात Balance ? 

- सर्वप्रथम  EPFO portal ला भेट द्या. आता इथं  ‘Our Services’ हा पर्याय निवडा आणि ड्रॉपडाऊनमधून ''For Employees” हा पर्याय निवडा. 
- आता 'सर्व्हिस' या पर्यायातून ‘Member passbook’ vfb[e. 
- तुमच्यासमोर लॉगईन पेज येईल. इथं UAN क्रमांक आणि पासवर्ड टाईप करा. 
- पुढे  ‘Member ID’ निवडून  ‘View Password [Old: Full]’ पर्याय निवडा. 
- तुमच्या पीएफ खात्याचा तपशील स्क्रीनवर दिसेल. 
- आता ‘Download Passbook’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही या माहितीची प्रिंट काढू शकता.