पीएफ खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, 'या' तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे

7 कोटी ग्राहकांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Jun 11, 2022, 04:33 PM IST
पीएफ खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, 'या' तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे title=

मुंबई : देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात (EPFO) चे 7 कोटी ग्राहक आहेत. या 7 कोटी ग्राहकांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. या सर्व EPFO ​खातेधारकांना पीएफ खात्यात लवकरच पीएफवरील व्याजाची रक्कम (PF Interest amount)जमा होणार आहे. त्यामुळे खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

EPFO ​खातेधारकांच्या खात्यात केंद्र सरकार लवकरचं व्याजदर हस्तांतरित करणार आहे. त्यामुळे या खातेधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2022 मध्ये पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याज दराची गणना केली आहे. लवकरच EPFO ​​खातेधारकांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2022 चे व्याजदर हस्तांतरित करणार आहे. सरकारच्या खात्यात जमा झालेले एकूण 72,000 कोटी रुपये नोकरदारांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील, असी माहिती आहे. खातेधारकांना ८.१ टक्के व्याज मिळणार आहे असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

या दिवशी होणार पैसे ट्रान्सफर
गेल्या वर्षी खातेधारकांना व्याजासाठी 6 ते 8 महिने वाट पाहावी लागली होती. पण, यंदा सरकार इतकी दिरंगाई करणार नाही. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 16 जूनपर्यंत व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील, अशी माहिती आहे. त्यामुळे पूढच्या आठवड्यात खातेधारकांना ही खुशखबर मिळणार आहे. 

EPF पोर्टलवर असं बॅलन्स तपासा 
 जर तुम्हाला ईपीएफओ पोर्टलवर तुमचं बॅलेन्स तपासायचं असेल, तर तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर जाऊन 'मेम्बर पासबुक' वर क्लिक करू शकता. यानंतर तुम्ही तुमचा UAN आणि पासवर्ड टाका. अशा प्रकारे लॉग इन करून, तुम्ही तुमच्या EPF खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता

SMS द्वारे असं बॅलन्स तपासा 
तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेची माहिती एसएमएसद्वारे देखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. EPFO UAN LAN एसएमएस बॉक्समध्ये टाइप करावे लागेल. LAN म्हणजे तुम्हाला कोणत्या भाषेत माहिती हवी आहे. तुम्हाला इंग्रजीत हवे असल्यास LAN ऐवजी ENG टाइप करा. मेसेज पाठवल्यानंतर काही वेळातच पीएफ बॅलन्सचा मेसेज तुमच्याकडे येईल. तुम्ही ज्या क्रमांकावरून एसएमएस पाठवत आहात तो तुमच्या EPF खात्याशी जोडलेला असावा.

मिस्ड कॉलद्वारेही बॅलन्स तपासा
तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस कॉल करून तुमच्या पीएफ खात्याचे तपशील मिळवू शकता. काही मिनिटांच्या मिस कॉलनंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. यासाठी तुमचे पीएफ खाते आधारशी लिंक केले पाहिजे.