श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाने एका चकमकीत दोन दहतवाद्यांचा खात्मा केला. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून रात्री उशिरा या भागात सर्च ऑपरेशन सुरु होतं. त्यानंतर सकाळी दहशतवाद्यांची माहिती मिळाली. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Encounter underway in Hardshiva area of Sopore. Police and security forces are on the job: Jammu & Kashmir Police pic.twitter.com/Uo1LpSSQOS
— ANI (@ANI) June 25, 2020
काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरु केली. संयुक्त पथकाकडून संशयित जागेला घेराव घातल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराला संयुक्त पथकाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आणि चकमक सुरु झाली. याभागात अद्यापही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
या वर्षात सुरक्षा दलाने आतापर्यंत काश्मीरमधील 108 अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये जास्तीत जास्त अतिरेकी ठार झाले आहेत.आता सुरक्षा दलाचं लक्ष उत्तर काश्मीरकडेही आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे 100 हून अधिक दहशतवादी असून त्यातील बहुतेक विदेशी दहशतवादी आहेत.