Encounter between security forces and terrorists in Baramulla : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये करहामा कुंजर आणि राजौरी या दोन ठिकाणी सुरक्षा दल - दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक सुरु आहे. यावेळी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला आहे. तसेच परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. राजौरीमध्ये ऑपरेशन त्रिनेत्र सुरु करण्यात आले आहे.
लष्कराचे जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन त्रिनेत्र सुरु आहे. मध्यरात्री दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात येत होता. बारामुल्लामध्ये अजूनही चकमक सुरुच आहे. काश्मीर झोन पोलिसांनी शनिवारी सांगितले की, बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात आणखी एक चकमक सुरु झाली आहे.
राजौरीमध्ये भारतीय जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत. त्यानंतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत काही दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जवानांकडून 'त्रिनेत्र' सर्च ऑपरेशन सुरूच आहेत. इथल्या केसरी हिल भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाली, त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
राजौरीतील कांडी जंगलात दहशतवादविरोधी कारवाई सुरु करण्यात आले होते. यावेळी पाच जवान शहीद झालेत. शनिवारी पहाटे 1.15 वाजता दहशतवाद्यांशी पुन्हा गोळीबार केला, असे संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी कंडी जंगल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले आणि एक अधिकारी जखमी झाला.
20 एप्रिल रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्न भारतीय लष्कराच्या तुकड्यांकडून करण्यात येत होता. तसेच भारतीय लष्कर जम्मू प्रदेशातील भाटा धुरियनच्या तोटा गली भागात लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला हुसकावून लावण्यासाठी अथक गुप्तचर-आधारित ऑपरेशन्स करत आहे, असे अधिकृत प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे.
राजौरी सेक्टरमधील कांडी जंगलात दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर 3 मे 2023 रोजी एक संयुक्त ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. 5 मे 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता, शोध पथकाने एका गटाशी संपर्क केला. यावेळी दहशतवादी एका गुहेत लपलेले होते. हा भाग खडकाळ आणि खड्डे युक्त होता, अशी माहिती देण्यात आली.