#VoteDaloDilli : ७० जागांकरता दिल्लीत तिरंगी लढत

१.४७ करोड मतदान आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.  

Updated: Feb 8, 2020, 02:32 PM IST
#VoteDaloDilli : ७० जागांकरता दिल्लीत तिरंगी लढत title=

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा (Delhi Assembly Election 2020) निवडणुकीच्या ७० जागांकरता आज मतदान होणार आहे. दिल्लीत १.४७ करोड मतदान आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत अतिशय शांतपणे मतदान व्हावं याकरता पोलिस बंदोबस्त करण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस, होमगार्ड सह सैनिक दल असे ७५ हजारहून अधिक जवान वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहेत. १.३० वाजेपर्यंत २७.३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

तर, मोठ्या संख्येने मतदार मतदान करण्यासाठी घरा बाहेर पडत आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत या लोकशाही उत्सवाला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही. 

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६७ जागांवर तर भाजपने फक्त 3 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस पक्षाने तर खातंच उघडलं नव्हतं. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान शनिवार ८ फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी आप विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी सामना असणास असून, 672 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. गेल्यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीकरांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता.

केजरीवाल त्या विजयाची पुनरावृत्ती करणार का? भाजपचे अमित शाह पुन्हा सत्त्ता खेचून घेणार का? आणि काँग्रेसला या निवडणुकीत किती जागा मिळणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.