Shivsena Election Symbol: ठाकरेंना दिलासा! शिंदे गटाला धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

election commission bow and arrow party symbol fight: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडली होती.

Updated: Feb 6, 2023, 10:03 PM IST
Shivsena Election Symbol: ठाकरेंना दिलासा! शिंदे गटाला धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय title=
election commission bow and arrow party symbol fight

Election Commission Bow And Arrow Party Symbol Fight: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर (Bow And Arrow Party Symbol) केलेल्या दाव्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मागील आठवड्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाची बाजू ऐकून घेतली होती. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाकडून निकाल आल्यानंतरच निकाल देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे गटाने केलेली मागणी

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी निकाल देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये असा युक्तीवाद उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडला होता मुद्दा. सुप्रीम कोर्टाने वेगळा निकाल दिल्यानंतर काय असा प्रश्न ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीसमोर उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच निकाल देणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 14 फेब्रुवारी रोजी नियमित सुनावणी होणार आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहणार

केंद्रीय निवडणूक आयोग आत्ताच निकाल देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाला निकाल देणं शक्य होणार का यासंदर्भात शिंदे गट आणि ठाकरे गटातील युक्तीवादादरम्यान चर्चा झाली. याच सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील एकत्रित सुनावणीनंतरच निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने युक्तीवादादरम्यान केलेली मागणी निवडणूक आयोग मान्य करणार असल्याची दाट शक्यता आहे. ही मागणी मान्य झाल्यास निवडणूक आयोग सध्याची परिस्थिती जैसे थे ठेवण्यास प्राधान्य देईल, असं चित्र दिसत आहे.

पुण्यातील पोटनिवडणूक लढ्यास चिन्हं कोणती?

अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह दिलं आहे. तर ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे. पुण्यातील आगामी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना अथवा शिंदे गटाकडून उमेदवार निवडणूक लढलाच तर त्यांना या दोनपैकी एका चिन्हावर निवडणूक लढावी लागणार आहे. शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव निवडणूक आयोगाने मंजूर केलं आहे. तर उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे.