नवी दिल्ली : भाजपाने पाठींबा काढून घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार पडले. त्यानंतर इथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर लवकरात लवकर विधानसभा निवडणुकीची मागणी नॅशनल कॉन्फरंस आणि पीडीपीसारखे पक्ष करत आहेत. आता निवडणूक आयोगाने यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. अमरनाथ यात्रेच्या नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेतल्या जातील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकांसोबतही ही निवडणूक होईल असे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही माहीती दिली.
आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. तिथल्या निवडणुकीबद्दल आम्ही अमरनाथ यात्रेनंतर घोषणा करु असे आयोगाने स्पष्ट केले. अमरनाथ यात्रा ऑगस्टमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी संपणार आहे. या दरम्यान महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाच्या देखील निवडणूका होणार आहेत. याआधी 2014 मधल्या निवडणुका देखील याच राज्यांसोबत झाल्या होत्या. त्यावेळी कोणत्याही पार्टीला बहुमत मिळाले नव्हते. यानंतर भाजपा आणि पीडीपीने मिळून सरकार स्थापन केले होते. या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही.
पुनर्रचना आयोगाच्या अहवालानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघाच्या सीमा बदलण्यात येणार आहेत. तर काही जागा या आरक्षित केल्या जाणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या असलेले मतदारसंघ योग्य प्रकारे नसल्याचं केंद्र सरकारचं मत आहे. जम्मूसोबत न्याय होत नसल्याचा त्यांचं मत आहे. सध्या काश्मीरमधून जास्त आमदार निवडून विधानसभेत जातात. सरकारचं म्हणणं आहे की, क्षेत्रीय भेदभाव संपवण्यासाठी हा निर्णय़ घेतला जावू शकतो. जर असं झालं तर जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री देखील बनू शकतो.
काश्मीर - ४६
जम्मू- ३७
लडाख- ४
पीडीपी 28
भाजप 25
नॅशनल कॉन्फरेन्स 15
काँग्रेस 12
मुस्लीम- 68.31%
हिंदू- 28.44%
शीख- 1.87%
ख्रिश्चन - 0.28%