नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ९ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे प्रचार आज संध्याकाळी ५ वाजता बंद होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह बीजेपीच्या अनेक मोठ्या नेत्यांची आज रॅली आहे. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासोबतच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये आहेत. ते सूरतमध्ये सभा घेणार आहत. ही सभा दुपारी एक वाजता सूरतच्या लिम्बायत विधानसभा मतदारसंघात होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज राजकोट, भावनगर, सुरेंद्रंद्रगर, आनंद आणि वाडोदरा येथे सभा घेणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देखील आज गुजरातमध्ये तीन सभा घेणार आहेत. ते आज सकाळी ११ वाजता मधुसर जिल्ह्यातील कडाणाच्या दिव्या ग्राऊंडवर, दुपारी 1 वाजता मेहसाना जिल्ह्यातील खेरालु महाविद्यालयात आणि ३ वाजता पाटण जिल्ह्यातील सिद्धपुरमध्ये सभा घेणार आहेत.