नवी दिल्ली : कोरोना विषाणूचं संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. आता 3 मे पर्यंत लॉकडाऊन देशात राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लोकांना 3 मे पर्यंत लॉकडाऊन अनुसरण करावे लागेल आणि शिस्तबद्ध रहावे लागेल. आर्थिक बाबतीत नुकसान होत आहे. परंतु देशवासीयांचे जीवन अधिक मूल्यवान आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवसाय ठप्प झाला असून त्याचा सर्वाधिक परिणाम कामगारांवर झाला आहे.
'सध्या हीच स्थिती आपल्यासाठी योग्य आहे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचा मोठा फायदा झाला आहे. आर्थिकदृष्ट्या हे महाग आहे पण नागरिकांच्या जीवाच्या पुढे याची किंमत नाही होऊ शकत. भारत ज्या मार्गावर आहे त्याची चर्चा जगभरात होणं स्वाभाविक आहे. राज्य सरकारने देखील जबाबदारीने काम केलं आहे. प्रत्येकांने जबाबदारी पार पाडली आहे. पण या सर्व प्रयत्नांमध्ये कोरोना ज्या प्रकार पसरत आहे. त्यामुळे सरकारला आणखी सतर्क केले आहे. आपण विजयी कसे होऊ. नुकसान कसं कमी होईल. लोकांच्या अडचणी कशा दूर होतील याबाबत राज्यांसोबत चर्चा केली. सगळ्यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबत सल्ला दिला आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवावा लागेल.'
'जगातील कोरोनाच्या स्थितीशी सगळेच परिचित आहेत. भारतात याला आळा घालण्यात आपण यशस्वी होत आहोत. कोरोनाचे रुग्ण १०० पर्यंत पोहोचण्याआधीच १४ दिवसांचं आयसोलेशन सुरु करण्यात आलं होतं. आपल्याकडे ५०० रुग्ण झाले तेव्हा आपण लॉकडाऊनचा मोठा निर्णय घेतला. या संकाटात कोणत्याच देशासोबत तुलना करणं योग्य नाही. पण सत्य हे आहे की जगातील बलवान देशांच्या तुलनेत भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे. कोरोना संक्रमणाने अनेक देशात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताने जलद निर्णय़ नसते घेतले तर काय स्थिती असती याबाबत विचार केला तरी अंगावर शहारे उभे राहतात."