नवी दिल्ली : आधार कार्डची मूळ प्रत हरवल्यास त्याऐवजी e- Aadhaar कार्डचा वापर केला जाऊ शकतो. आधार अधिनियमनुसार, e- Aadhaarची कॉपी कामकाजावेळी दाखवली जाऊ शकते. जर एखाद्या कारणामुळे इनरोलमेंटनंतर आधार कार्ड पोहचण्यास वेळ लागत असेल किंवा आधारची मूळ प्रत हरवली तर ई-आधार डाऊनलोड करुन प्रिंट काढता येऊ शकते.
e- Aadhaar डाऊनलोड करण्यासाठी -
- https://uidai.gov.in/ वर 'माय आधार' सेक्शनमध्ये डाऊनलोड आधारवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल https://eaadhaar.uidai.gov.in/#/
- या लिंकवर आधार क्रमांक, इनरोलमेंट आयडी किंवा व्हर्चुअल आयडी भरावा लागेल.
- त्यानंतर आवश्यक ते डिटेल्स नाव, पिन कोड, सिक्योरिटी कोड भरावा लागेल.
- जर मास्क्ड आधार हवं असेल तर तो पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर OTP रिक्वेस्ट पाठवली जाईल. OTP त्याच नंबरवर येईल, जो मोबाईल क्रमांक आधार कार्ड बनवताना रजिस्टर केला असेल.
- OTP टाकल्यानंतर 'व्हेरिफाय अँड डाऊनलोड'वर क्लिक करा.
- त्यानंतर आधार कार्डची ई-कॉपी डाऊनलोड होईल.
e- Aadhaar काढण्यासाठी पासवर्ड -
e- Aadhaar काढण्यासाठीचा पासवर्ड तुमच्या नावाची पहिलं चार इंग्रजी अक्षरं कॅपिटल लेटर्समध्ये टाकावी लागतील. त्यानंतर ज्या वर्षी जन्म झाला आहे, ते जन्म साल टाकावं लागेल. जर कोणाचं नाव तीन अक्षरी असेल, तर नावाची पहिली तीन अक्षरं आणि त्यापुढे जन्म साल टाकावं लागेल. या पासवर्डसह डाऊनलोड झालेलं e- Aadhaar प्रिंट करता येऊ शकतं.