Kitchen Tips: भारतात लसणाचा वापर जवळपास प्रत्येक प्रकारच्या जेवणात केला जातो. हे जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानले जाते. डाळ असो, भाज्या असो किंवा चायनीज पदार्थ असो, लसूण नक्कीच वापरला जातो. पण लसूण सोलणे हे खूप वेळखाऊ काम आहे. जेव्हा लसूण सोलाण्यास सांगितले जाते, याचा विचार करुनचं आपल्या कपाळावर आठ्या पडायला सुरुवात होते. लसणाचा प्रत्येक तुकडा वेगळा काढणे केवळ कंटाळवाणे काम नाही तर त्यासाठी खूप वेळ लागतो आणि लसणाची साले तुमच्या बोटांना चिकटून राहतात, त्यामुळे काम अजूनच कठीण होते.
लसूण कसा सोलायचा ?
१. लसूण सोलण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लसणाच्या पाकळ्या एका कपड्यात ठेवा आणि आता ते कापड झाका. आता आपल्या हातांनी त्याला जोरात चोळा. तुम्ही बेलनही फिरवू शकता. असं केल्याने लसणाची साल निघते आणि कचरा अर्थात त्याचे कव्हर कपड्यातच राहतात .
2. लसूण सोलण्याच्या सोपी पद्धत म्हणजे लसूण मध्यभागी कापून घ्या. आता त्याला प्लेटवर ठेवा आणि चाकूच्या मदतीने टॅप करा. तुम्हाला दिसेल की लसणाच्या पाकळ्या त्यांच्या सालीपासून वेगळ्या होतील.
३. याशिवाय, लसूण सोलण्यासाठी, तव्यावर हलके गरम करा. यामुळे त्याची साल सहज निघते.
वाचा : आधार कार्डशी संबंधित ‘ही’ चूक तुम्हाला पडू शकते महागात!
४. जर तुम्ही घरी मायक्रोवेव्ह वापरत असाल तर लसूण सोलण्यासाठी त्याला 30 सेकंद मायक्रोवेव्ह करा आणि जेव्हा तुम्ही ते बाहेर काढाल तेव्हा त्याची साल सहज निघतील.
५. लसूण सोलण्याचा सोपा मार्ग म्हणजे लसूण दोन वाट्यांमध्ये ठेवा आणि वाटी जोरात हलवा. तुम्हाला दिसेल की वाटी उघडल्यानंतर त्याची साल निघालेली असतील.
क्रश पद्धत सर्वोत्तम का आहे?
बहुतेक लोक या पद्धतीला पसंती देतात, कारण यासाठी तुम्हाला कोणत्याही वेगळ्या साधनाची आवश्यकचा भासत नाही. या पद्धतासाठी फक्त एक कटिंग बोर्ड आणि एक चांगल्या सुरीची आवश्यकता आहे. ही एक मल्टीटास्किंग पद्धत देखील आहे ज्याद्वारे लसणीची फक्त सालच निघत नाही तर लसूण देखील ठेचला जातो.