मुंबई : तुम्हालाही घरी बसून पैसे कमवायचे आहेत का? जर तुमच्याकडेही जुन्या नोटा असतील, तर त्या तुमच्यासाठी कमाईचे साधन बनू शकतात. जर तुम्हालाही जुन्या नोटा गोळा करण्याची आवड असेल, तर तुम्ही करोडपती होऊ शकता. कारण बऱ्याच लोकांना जुने नाणं किंवा नोटा जमा करण्याचा छंद असतो, ज्यासाठी तुम्हाला ते लोकं लाखोंमध्ये पैसे मोजायला तयार असतात. आज आम्ही तुम्हाला 1 रुपयांच्या अशाच नोटींबद्दल सांगत आहोत, ज्या विकून तुम्ही लखपती बनू शकता.
जर तुम्ही लहानपणी छंद म्हणून 1, 5 आणि 10 रुपयांच्या नोटा गोळा केल्या असतील आणि त्यांची पिग्गी बँक तयार केली असेल, तर आता त्या नोटा तुम्हाला लखपती बनऊ शकतात. या नोटां बाजारात जरी चालत नसल्या, तुम्हाला त्याच्यापासून कोणतीही वस्तू विकत घेता येत नसली, तरी त्यापैशांचे मुल्य आज जास्त आहे. कारण या नोटांचा अनेक वेबसाईटवर लिलाव होत आहे आणि त्या नोटींच्या बदल्यात चांगली रक्कम मिळत आहे.
देशात अशा अनेक वेबसाइट्स आहेत, ज्या जुन्या नोटा खरेदी करतात आणि त्या बदल्यात चांगली रक्कम देतात. ईबे Ebay, कॉइनबाजार CoinBazzar, कलेक्टर बाजार (CollectorBazar) या अशा साइट्स आहेत, जिथे तुम्ही 1, 5 आणि 10 रुपयांच्या जुण्या नोटा विकू शकता.
एवढेच नाही तर तुम्ही या साइट्सवरून दुर्मिळ नाणी खरेदी देखील करू शकता. या साइट्सकडून देखील असा दावा आहे की, जुन्या नोटा येथे विकल्या जातात.
ही नोट 1957 मधली असावी आणि त्यावर राज्यपाल एच एम पटेल यांची स्वाक्षरी असावी आणि त्याचा अनुक्रमांक 123456 असावा.
1 रुपयाची नोट जरी भारत सरकारकडून चलनात नसली, तरी त्याची किंमत हजारो रुपयांची आहे. 1 रुपयांच्या नोटांचे बंडल 45 हजार रुपयांपर्यंत विकले जाऊ शकते. CoinBazzar च्या वेबसाईटवर, 1 रुपयांच्या बंडलची किंमत 49 हजार 999 रुपये आहे.
यासाठी तुम्ही वेबसाइटवरील शॉप सेक्शनमध्ये जा आणि नोट्सवर क्लिक करा आणि नोट्स बंडलवर जा. इथे तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल.