Stock to Buy | 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर; तुमच्या पोर्टफोलियोचा 'गोडवा' वाढवणार

 शेअर बाजारात पैसा गुंतवण्यासाठी संबधीत कंपनीच्या स्टॉकची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे असते.

Updated: Sep 16, 2021, 01:27 PM IST
Stock to Buy | 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर; तुमच्या पोर्टफोलियोचा 'गोडवा' वाढवणार title=

मुंबई : शेअर बाजारात पैसा गुंतवण्यासाठी संबधीत कंपनीच्या स्टॉकची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे असते. जेव्हा तुम्ही पैसा गुंतवता तेव्हा रिस्क कॅल्कुलेशन व्यवस्थित करा. शेअर बाजारात पैसे गुंतवताना बाजाराची चाल समजून घ्या. शेअर बाजारातील मार्केट एक्सपर्टचा सल्ला जाणून घ्या.

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी कॅश मार्केटच्या  Dwarikesh Sugar  या दमदार शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ही कंपनी 1994 पासून काम करीत आहे. गेल्या 5 वर्षात कंपनीची चागंली कामगिरी राहिली आहे.

Dwarikesh Sugar - Buy Call
CMP - 73.56
Target - 80-85
अवधी - 6-9 महीने

कंपनीचे फंडामेंटल्स
संदीप जैन यांनी म्हटले की, कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. कंपनी हळु हळु आपल्या कर्जातून बाहेर येत आहे. कंपनीचा डिविडंड यील्डसुद्धा चांगली कामगिरी करीत आहे. 

कंपनीचे क्रेडिट रेटिंग A+ आहे. कंपनीमध्ये  FII आणि DIIsमध्ये सलग हिस्सेदारी वाढली आहे. मागील वर्षी जून तिमाहीमध्ये कंपनीने 28 कोटींचा नफा सादर केला होता. तर या वर्षीदेखील कंपनीने 27 कोटींचा नफा सादर केला आहे. येत्या काळात कंपनी चांगला नफा कमावण्याची शक्यता आहे.