मुंबई : सध्या सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तसेच वधू-वरांशी संबंधीत व्हिडीओ पाहायला तर लोकांना फार आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. युजर्स या व्हिडीओची मजा घेत आहेत आणि आपल्या मित्रांना देखील तो शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये वरमाला घालण्याच्या दरम्यान एक अशी गोष्ट करतो की, ज्यामुळे नववधूवर शरमेनं लाल व्हायची वेळ येते.
आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की, असं नक्की या नवऱ्यानं काय केलं असावं? तर त्याने चक्कं आपल्या बायकोचे पाय धरले.
वरमालाच्या वेळी पत्नी पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेते हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल, पण तुम्ही कधी वराला आपल्या नवरीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना पाहिले आहे का?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की वधू-वर स्टेजवर वरमाला घेऊन उभे आहेत. सर्व प्रथम, वधू आपल्या वराला जयमाला घालते. यानंतर ती आपल्या भावी पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेते. पुढच्याच क्षणी, वरही आपल्या वधूला वरमाला घालतो आणि मग नतमस्तक होऊन आपल्या वधूच्या पायाला स्पर्श करू लागतो.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर sakhtlogg नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर भरभरुन लाईक्स करत आहेत. अगदी काही क्षणात हा व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे.