कोलकाता : धोतर घातलं असल्याने एका व्यक्तीला कोलकातामधील क्वेस्ट मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. धोतर आणि कुर्ता असा पारंपरिक वेश परिधान करुन ही व्यक्ती या मॉलमध्ये जाणार होती. यावेळी त्या व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश करण्यापासून सुरक्षारक्षकाने थांबवलं.
प्रवेश नाकारण्यात आलेल्या व्यक्तीसोबत अभिनेत्री डेबलिना सेन देखील होती. माझ्या मित्राने व्यवस्थित कपडे घातले होते. त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीही नव्हतं असं डेबलिना यांनी म्हटलं आहे. डेबलिना यांनी फेसबुकवरुन या घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे धोतर किंवा लुंगी घातली असल्यास हा मॉल प्रवेश करु देत नाही असंही डेबलिना यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर नमूद केलं आहे. मात्र मॉल प्रशासनानं याबाबतचं वृत्त फेटाळलं आहे.