Drug Seized Gujarat : गुजरातमधील द्वारकेत 350 कोटींचे ड्रग्ज जप्त

Drug Seized in Gujarat : ड्रग्ज प्रकरणात सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असतानाच आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

Updated: Nov 11, 2021, 02:39 PM IST
Drug Seized Gujarat : गुजरातमधील द्वारकेत 350 कोटींचे ड्रग्ज जप्त  title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : Drug Seized in Gujarat : ड्रग्ज प्रकरणात सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असतानाच आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणी गुजरात पोलिसांनी द्वारका शहरात मोठी कारवाई केली आहे. तब्बल 350 कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Drug Seized Gujarat) द्वारका शहरात पकडलेल्या 66 किलो ड्रग्जची किंमत सुमारे  350 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Drug Seized : Drugs worth Rs 350 crore seized in Dwarka, Gujarat )

सध्या देशभरात ड्रग्ज प्रकरणावरून आरोप - प्रत्यारोप होत असताना गुजरात पोलिसांनी ड्रग्ज साठा जप्त (Drug Seized Gujarat) केल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, Drug प्रकरणी गुजरात पोलिसांनी राजस्थानातील एकाला ताब्यात घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात  ड्रग्जचा साठा कोणत्या कारणासाठी आणण्यात आला, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, समुद्रामार्गे हा ड्रग्स साठा पुरवला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

द्वारकाचे एसपी सुनील जोशी यांनी सांगितले की,  शहराच्या खबालीया हायवेवर आराधना धामच्याजवळ असलेल्या एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्या आरोपीजवळ असलेल्या बॅगेत ड्रग्ज असल्याचे आढळून आले. दरम्यान त्या व्यक्तीची कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडे 66 किलो ड्रग्स आढळले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीने  अद्यापही याबाबत तोंड उघडले नाही. 

 दरम्यान, या आधी गुजरातमधील कच्छच्या मुंद्रा बंदरातून 21  हजार कोटी रुपयांची ड्रग्ज साठा पकडण्यात आला होता. आता पुन्हा ड्रग्ज सापल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा सुरु असताना आता गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्ज साठा मिळाल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.