भूमिगत पाइपलाइन टाकून पेट्रोल चोरी करणारे गजाआड

आता  भूमिगत पाइपलाइन टाकून पेट्रोल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Updated: Jan 25, 2018, 03:05 PM IST
भूमिगत पाइपलाइन टाकून पेट्रोल चोरी करणारे गजाआड  title=

द्वारका : भुयार खोदून बॅंक लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता  भूमिगत पाइपलाइन टाकून पेट्रोल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

द्वारका येथील  सूरज विहार इथून हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मोहम्मद तन्वीर या आरोपीला अटक केली असून दोनजण पळून जाण्यास यशस्वी झाले.

आग लागल्याने प्रकार उघडकीस 

पेट्रोल चोरी करत असताना गॅसचा दबाव निर्माण होऊन आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण प्रकार समोर आला.

सूरज विहार येथील एनएसआयटी महाविद्यालयाच्या समोर भाड्याच्या जागेत मोहम्मदचे भंगारचे दुकान होते. 

जवळून पानिपत ते बिजवास आयओसीच्या डेपोपर्यंत पेट्रोलंपपची पाइपलाइन जात होती.

भूमिगत पाइपलाइन 

याचा फायदा घेत मोहम्मद आणि त्याच्या मित्रांनी  पाच फूट रूंद आणि १० फूट खोल व आत १५० फूट सुरूंग बनवली होती.

पेट्रोल पाइपलाइनमध्ये २ इंचाचा प्लास्टिक पाइप टाकत हा गैरप्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी जागामालकाविरोधातही तक्रार दाखल केली आहे.