दिल्लीत दोन वृद्ध मराठी बहिणींची निर्घृण हत्या

गेल्या ३५ वर्षांपासून दोघी दिल्लीत एकत्र राहत होत्या.

Updated: Oct 26, 2018, 07:43 AM IST
दिल्लीत दोन वृद्ध मराठी बहिणींची निर्घृण हत्या title=

नवी दिल्ली: दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात गुरुवारी दुपारी दोन मराठी वृद्ध महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आशा पाठक आणि उषा पाठक असे हत्या करण्यात आलेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत. या दोघींवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर दोघींचा गळाही आवळण्यात आला, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.
 
 या दोघींच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्याकडे प्लंबिगच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस मारेकर्‍याचा शोध घेत आहेत.
 
गेल्या ३५ वर्षांपासून दोघी दिल्लीत एकत्र राहत होत्या. उषा पाठक या उत्तर प्रदेशातील एका महाविद्यालयात संगीताच्या शिक्षिका होत्या तर आशा पाठक या कृषी भवनमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत.