Debit Card घरी विसरलात तरी चिंता नसावी, अशा पद्धतीने काढाल एटीएममधून पैसे

पर्समध्ये डेबिट कार्ड असल्याने देशातील कोणत्याही एटीएम कार्डमधून रोख काढणं सोपं झालं आहे. पण कधी कधी आपण आपलं एटीएम कार्ड घरी विसरतो. त्यामुळे आपण पुन्हा घराकडे धाव घेतो. पण आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएमची आवश्यकता नाही.

Updated: Nov 8, 2022, 04:24 PM IST
Debit Card घरी विसरलात तरी चिंता नसावी, अशा पद्धतीने काढाल एटीएममधून पैसे title=

Forgot ATM Card At Home No Worry: तंत्रज्ञानाच्या युगात सर्वकाही झटपट झालं आहे. पूर्वी बँकांमध्ये तासंतास रांगा लावून पैसे भरावे किंवा काढले जायचे. आता तंत्रज्ञान इतकं विकसित झालं की आहे एका क्लिकवर सर्वकाही होतं. पर्समध्ये डेबिट कार्ड असल्याने देशातील कोणत्याही एटीएम कार्डमधून रोख काढणं सोपं झालं आहे. पण कधी कधी आपण आपलं एटीएम कार्ड घरी विसरतो. त्यामुळे आपण पुन्हा घराकडे धाव घेतो. पण आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएमची आवश्यकता नाही. फक्त तुमच्याकडे तुमचा मोबाईल असणं आवश्यक आहे. सध्या काही बँका या सुविधा देत आहेत. मात्र आरबीआयनं याचं कार्यक्षेत्र वाढवलं आहे. विना एटीएम कार्ड पैसे काढण्यासाठी युपीआयचा वापर केला जातो. यामुळे पैशांची देवाणघेवाण एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे बँकांना देखील दिलासा मिळणार आहे.

एटीएममधून विना डेबिट कार्ड कसे पैसे काढाल?

तुमच्या स्मार्टफोनमध्ये यूपीआय अॅप असणं आवश्यक आहे. जसं की BHIM, Paytm, Gpay, Phonepe यापैकी एखादं अॅप असावं. त्यानंतर एटीएममध्ये जाऊन विना कार्ड पैसे काढण्याचा पर्याय निवडा. स्क्रिनवर यूपीआयद्वारे क्यूआर कोड दिसेल. आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील यूपीआय अॅप ओपन करा आणि स्क्रिनवरील क्यूआर कोड स्कॅन करा. यूपीआयच्या माध्यमातून ऑथेंटिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकाल. 

Knowledge News: ट्रेनच्या छतावर गोल झाकणं का असतात? जाणून घ्या या मागचं कारण

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या मते, एटीएमशिवाय पैसे काढण्यासाठी हा सोपा आणि सोयीचा मार्ग आहे. यामुळे कार्ड क्लोनिंग आणि स्किमिंगसारख्या घटना देखील कमी होतील. त्याचबरोबर कार्डची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे वापरलेला QR कोड कॉपी केला जाऊ शकत नाही. फसवणुकीची प्रकरणे कमी करण्यासाठी हा कोड सतत बदलला जातो.