भगवान जगन्नाथांच्या कृपेनं डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; कोण करतंय हा दावा?

Donald Trump Shooting : जागतिक स्तरावरील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असून, सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ला...   

सायली पाटील | Updated: Jul 15, 2024, 02:02 PM IST
भगवान जगन्नाथांच्या कृपेनं डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; कोण करतंय हा दावा?  title=
Donald Trump Shooting attack Lord Jagannath saved former US President Iskcon vice president tweet viral

Donald Trump Shooting : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर जगभरातून असंख्य प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर हा हल्ला कोणी केला इथपासून हल्ला का करण्यात आला इथपर्यंतच्या अनेक चर्चांनी दोर धरला. या साऱ्यामध्ये इस्कॉनच्या वतनी करण्यात आलेला दावा अनेकांचच लक्ष वेधून गेला. कारण, इथं ट्रम्प यांचं नातं थेट भगवान जगन्नाथ यांच्याशी जोडलं गेलं होतं. 

कोलकाता येथील इस्कॉन मंदिराच्या उपध्यक्षस्थानी असणाऱ्या राधारमण दास यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव भगवान जगन्नाथ यांच्यामुळं वाचल्याचा दावा केला. X च्या माध्यमातून एक पोस्ट लिहित त्यांनी हा दावा केला. जिथं त्यांच्या बोलण्याचा रोख जगन्नाथपुरी येथील रथयात्रेकडे दिसून आला. इथं संपूर्ण जग रथयात्रा उत्सव साजरा करत असतानाच तिथं ट्रम्प यांच्यावर हा हल्ला झाला, जणू भगवान जगन्नाथ यांनी त्यांचा जीव वाचवून एका उपकाराची परतफेडच केली. 48 वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा संदर्भ त्यांनी इथं दिला. 

48 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं?  

जुलै 1976 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी रथांच्या निर्मितीसाठी स्वत:चं रे्ल्वे यार्ड देत इस्कॉन भक्तांची एका अर्थी यात्रेच्या आयोजनासाठी मदत केली होती. आज जेव्हा संपूर्ण जग 9 दिवसांचा हा उत्सव साजरा करत आहे, त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला होतो जिथं ते थोडक्यात बचावतात. इथं खुद्द भगवान जगन्नाथ यांचं योगदान लक्षात येतं, असं पोस्टमध्ये लिहित त्यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या. 

हेसुद्धा वाचा : Donald Trump : जीवापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांना 'या' गोष्टीची चिंता, व्हिडीओ व्हायरल

 

ट्रम्प यांच्यावर कोणी केला हल्ला? 

अमेरिकेतील पेन्सेल्वेनिया इथं निवडणुकीसाठीच्या एका सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमध्ये एक गोळी त्यांच्या कानाला स्पर्श करून गेली आणि ट्रम्प जखमी झाले. ही संपूर्ण घटना आणि घटनाक्रम पाहता यामध्ये दैवी हस्तक्षेप असल्याची धारणा इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी व्यक्त केली. 

आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी जे संदर्भ दिले, त्यानुसार 1976 मध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीनंच पहिल्यांदाच जगन्नाथ यात्रा सुरू झाली होती. त्यावेळी म्हणजेच 48 वर्षांपूर्वी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन)कडून न्यूयॉर्कमध्ये यात्रेच्या वाटेत अनेक अडथळे होते. तेव्हा खुद्द ट्रम्प यांनी फिफ्थ एवेन्यूच्या वापराती परवानगी देत एक मोठा  निर्णय घेतला होता. याच निर्णयाची, एका अर्थी उपकाराची परतफेड देवानं केली असा दावा इस्कॉनच्या वतीनं केला जात आहे.