नवी दिल्ली : Supreme Court slams central government : सत्तेच्या खेळात तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले. नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेच्या अभ्यासक्रमात आयत्यावेळी बदल करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. (Don’t play young doctors football, Supreme Court slams central government)
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरले होते. लसीकरणाचा मुद्दा असो वा ऑक्सिजन पुरवठ्याचा. वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेची देशातल्या न्यायिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली आहे. त्यात आता अजून एका मुद्द्याची भर पडली आहे. तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. केंद्र सरकारने या बदलाबाबत योग्य उत्तर न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. त्या विषयासंदर्भात अन्य दोन संस्थांबरोबर एका आठवड्यात बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी ही प्रवेशपत्रं वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करता येणार आहेत. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबरला देशातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.
तसेच मूल्यमापनाचा यावर्षीही घोळ होण्याची चिन्हे आहेत. 10 वी आणि 12 वी परीक्षा यावर्षीही रद्द करावी लागली तर त्यासाठीचे नियोजन अजून कागदावरच आहे. घटकचाचणीची वेळ टळून गेली तरी शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना अजून सूचनाच नाही. काही शाळांनी त्यांच्या पद्धतीने चाचणीही घेतली आहे. मात्र चाचणीच्या पद्धतीत समानता राहिलेली नाही.
मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आर्टस, कॉमर्स, सायन्स पदवी सत्र 5 च्या परीक्षा 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान होतील. या परीक्षा MCQ पद्धतीने ऑनलाईन होणार आहेत. ६ व्या सेमिस्टरच्या बॅकलॉग परीक्षा 7 ते 20 डिसेंबरदरम्यान होतील. इतर प्रोफेशनल कोर्सेसच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.