कुत्र्याचा जबरदस्त Drama कॅमेऱ्यात चित्रीत, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते. प्राण्यांमध्ये सर्वाधिक पसंती ही पाळीव कुत्र्यांना मिळते.

Updated: Sep 27, 2022, 03:12 PM IST
कुत्र्याचा जबरदस्त Drama कॅमेऱ्यात चित्रीत, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल title=

Dog Drama Video Viral On Social Media: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते. प्राण्यांमध्ये सर्वाधिक पसंती ही पाळीव कुत्र्यांना मिळते. कुत्रा माणसांच्या जवळ राहणारा आणि सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कुत्र्याच्या हरकती (Dog Drama Viral Video) नेटकऱ्यांना चांगल्याच भावतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कुत्र्याचा जबरदस्त अभिनय दिसत आहे. कुत्रा आपल्या जबरदस्त अभिनय कौशल्याने नेटकऱ्यांना हसण्यास भाग पाडतो. 

व्हायरल व्हिडीओत एक कुत्रा रस्त्यावर खाणं घेण्यासाठी लंगडत लंगडत जातो. त्यामुळे कुत्र्यांची अशी दयनीय स्थिती पाहून किव येते. कोणीतरी त्याच्या पायाला दुखापत केली असावी, असा पहिल्यांदा समज होतो. कुत्राही लंगडत लंगडत खाणं देणाऱ्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि अन्न तोंडात घेतो. पण परताना त्याचा बनाव उघड होतो. चार पायांवर जाताना पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 23 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.