...म्हणून कुत्र्याचे शेपूट आणि कान मीठ टाकून खाल्ले; बेवड्याचे किळसवाणे कृत्य पाहून पोलिस हादरले

या घटनेत कुत्र्याची ही दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाली आहेत. आरोपीने दारुच्य नशेत हे भयानक कृत्य केले. स्थानिकांना या माथेफिरुचे कृत्य निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. आरोपी आणि त्याच्या मित्राने एकत्रित दारु पिण्याचा प्लान आखला होता. 

Updated: Dec 14, 2022, 10:26 PM IST
...म्हणून कुत्र्याचे शेपूट आणि कान मीठ टाकून खाल्ले; बेवड्याचे किळसवाणे कृत्य पाहून पोलिस हादरले title=

Shocking News : माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक, क्रूर आणि किळसवानी घटना उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) बरेलीमध्ये(Bareli) घडली आहे. एका मद्यपीने  कुत्र्याचे शेपूट आणि कान कापले. यानंतर याच्यावर मीठ लावून आरोपीने हे दारु सोबत खाल्ले आहेत(Dog abuse). आरोपीचे हे कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एसडीएम कॉलनीत ही घटना घडली आहे. एका मद्यधुंद व्यक्तीने कुत्र्याच्या पिल्लांना जबरदस्ती पकडले. एका पिलाचे याने कान कापले तर दुसऱ्या पिलाचे शेपूट कापले. दारूसोबत चकणा म्हणून त्याने हे शेपूट आणि कान चकणा म्हणून खाल्ले आहेत.

या घटनेत कुत्र्याची ही दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाली आहेत. आरोपीने दारुच्य नशेत हे भयानक कृत्य केले. स्थानिकांना या माथेफिरुचे कृत्य निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. आरोपी आणि त्याच्या मित्राने एकत्रित दारु पिण्याचा प्लान आखला होता. या दोघांनी अती प्रमाणात मद्य प्राशन केले. दारुच्या नशेतच त्यांनी कुत्र्याच्या पिल्लावर गंभीर हल्ला केला. तसेच कुत्र्याच्या पिलाचे अवयव कापून खाल्ले. आरोपींविरोधात प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा (Prevention Cruelty Animals Act)  दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या पूर्वीही घडल्या आहेत प्राण्यांवरील अत्याचाराच्या घटना

उत्तर प्रदेशात या पूर्वी देखील प्राण्यांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. व्यक्तीने उंदराच्या शेपटीला दगड बांधून त्याला नाल्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी मनोज कुमार नावाच्या तरुणाला तब्बल 10 तास त्याला जेलमध्ये काढावे लागले. प्राणी प्रेमी विकेंद्र शर्मा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी मृत उंदराला पाण्यातून बाहेर काढलं आणि शनविच्छेदनासाठी पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठवलं. याचा तपास करताना पोलिसांनी उंदराचे पोस्टमार्टम देखील केले होते. कुत्र्याच्या पिल्लाला दगडाने ठेचून ठार करण्यात आले होते. सातत्याने प्राण्यांसह घडणाऱ्या या क्रूर घटनांबाबत प्राणी प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.