3 idiots ची रियल कॉपी; डॉक्टरने केली Video Call वर प्रसुती अन्... धक्कादायक प्रकार समोर!

Doctor tried delivery on video call: शासकीय रुग्णालयात (Government Hospital) मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. थ्री इडियट्स या चित्रपटाची पुनरावृत्ती सरकारी डॉक्टरने प्रत्यक्षात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Updated: Dec 12, 2022, 07:04 PM IST
3 idiots ची रियल कॉपी; डॉक्टरने केली Video Call वर प्रसुती अन्... धक्कादायक प्रकार समोर! title=
doctor,delivery,video call

Crime News: थ्री इडियट्स हा सिनेमा (3 idiots) सर्वांनाच आवडतो, मग तो तरूण मुलगा असो किंवा म्हातारे कोतारे... अनेकांना हा सिनेमा पाहिल्यावर कॉलेजचे सर्वात सुंदर दिवस आठवतात. या सिनेमाच्या अखेरीस पियाची बहिण मोना हिची व्हिडीओ कॉलवर डिलिव्हरी (Doctor tried delivery on video call) केली जाते. अशीच घटना पंजाबच्या मानसामध्ये (Manasa Crime News) घडली आहे. मात्र, सिनेमा वेगळा आणि रियल लाईफ वेगळी... (doctor tried delivery on video call woman and new born dies in manasa crime marathi news)

नेमकं काय घडलं?

शासकीय रुग्णालयात (Government Hospital) मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. थ्री इडियट्स या चित्रपटाची पुनरावृत्ती सरकारी डॉक्टरने प्रत्यक्षात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र हा निष्काळजीपणा धोकादायक ठरला आहे. प्रसुती (Delivery) झालेल्या आईचा आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर (Woman and New born Dies) नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला.

प्रसूतीसाठी डॉक्टर नसल्याचा (Doctor tried delivery on Video Call) आरोप नातेवाईकांनी केला आहे. महिलाला त्रास जाणवू लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ताबोडतोब डॉक्टरांना बोलावलं, मात्र डॉक्टर घटनास्थळी पोहोचले नाहीत. डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांना व्हिडिओ कॉल (Video Call) करून प्रसूतीसाठी करायला लावली. डॉक्टर व्हिडीओ कॉलवर कर्मचाऱ्यांना सांगत होते त्याप्रमाणे हॉस्पिटलमधील कर्मचारी काम करत होते, मात्र या दरम्यान आई आणि बाळाचा मृत्यू झाला.

आणखी वाचा - Single Cigarette Ban: धुम्रपान करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'Single' सिगरेट विक्रीवर येणार बंदी?

दरम्यान, ही घटना पंजाबमध्ये (Panjab News) वाऱ्याच्या वेगाने पसरली. या घटनेनंतर माजी आरोग्यमंत्री आणि आमदार विजय सिंगला (Vijay Singla) यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालयाने प्रकरणाची चौकशी करून डॉक्टर आणि स्टाफवर कारवाई असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता परिवाराने सुटकेचा श्वास घेतला आहे.