कधी ऐकलंय का? नाकावाटे सुई डोक्यात गेली...गुंतागुतीच्या शस्त्रक्रिेयेनंतर डॉक्टरांनी वाचवले रूग्णाचे प्राण

कोलकाता शहरात डॉक्टरांनी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी रूग्णाच्या डोक्यातून सुई बाहेर काढली आहे. या कठीण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी 50 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेज कोलकाता या वरिष्ठ डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.

Updated: Aug 1, 2021, 08:18 AM IST
कधी ऐकलंय का? नाकावाटे सुई डोक्यात गेली...गुंतागुतीच्या शस्त्रक्रिेयेनंतर डॉक्टरांनी वाचवले रूग्णाचे प्राण title=

मुंबई : कोलकाता शहरात डॉक्टरांनी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी रूग्णाच्या डोक्यातून सुई बाहेर काढली आहे. या कठीण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी 50 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेज कोलकाता या वरिष्ठ डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.

नाकातून होत होता रक्तस्राव

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, पिडीत व्यक्तीने नशेमध्ये असताना नाकातून रक्तस्राव होत असल्याची तक्रार केली होती. हे प्रकरण गंभीर असल्याने त्याला तातडीने रूग्णालयात भर्ती करण्यात आलं. रूग्णाबाबत अधिक माहिती नसल्याने त्याच्या डोक्याचा सिटी स्कॅन करण्यात आला. 

ज्यावेळी या रूग्णाचा रिपोर्ट आला तेव्हा समजलं की सुई त्याच्या नाकाच्या वाटेने डोक्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मुख्य म्हणजे नाकावाटे धातूची सुई डोक्यात पोहोचून देखील तो व्यक्ती पूर्णपणे शुद्धीत होता. 

सुई नाकात कशी गेली याबाबत स्पष्टता नाही

दरम्यान डॉक्टरांना अजून हे समजू शकलेलं नाही की या व्यक्तीच्या नाकावाटे सुई आत कशी गेली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सुई डोक्यामध्ये नेमकी कोणत्या जागेवर आहे हे समजण्यासाठी एंजियोग्राम करावा लागला. त्यानंतर आम्ही त्याच्या डोक्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर ही सुई त्याच्या नाकातून बाहेर काढली.

शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये डॉ आदित्य मंत्री, डॉ अमित कुमार घोष, डॉ क्रिस्टोफर गर्बर आणि डॉ चंद्रमौली बालसुब्रमण्यम यांचा समावेश होता.