स्टेशनच्या नावासमोर सेंट्रल का लिहिलेलं असतं? टर्मिनल कशाला म्हणतात?

तुम्ही हे देखील नोटीस केलं असेल की, प्रत्येक स्टेशनच्या नावापुढे टर्मिनल किंवा जंक्शन लिहिलेले असते. 

Updated: Jan 5, 2022, 08:19 PM IST
स्टेशनच्या नावासमोर सेंट्रल का लिहिलेलं असतं? टर्मिनल कशाला म्हणतात? title=

मुंबई : जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करतो तेव्हा आपल्याल आपल्या प्रवासात अनेक स्टेशन्स लागतात.  मग ते तुम्ही शहरात प्रवास करा किंवा राज्याबाहेर ट्रेन स्टेशनवरती थांबते. त्या प्रत्येक स्टेशनचं नाव हे वेगवेगळं असते. त्यावेळी तुम्ही हे देखील नोटीस केलं असेल की, प्रत्येक स्टेशनच्या नावापुढे टर्मिनल किंवा जंक्शन लिहिलेले असते. त्याच वेळी, काही स्थानके आहेत ज्यांच्या नावापुढे सेंट्रल असं लिहिलं जातं. जसे- मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल. मग हे असं का लिहिलेलं असतं? याचा अर्थ काय?

सेंट्रल स्टेशन म्हणजे ते त्या शहरातील सर्वात महत्वाचे स्टेशन आहे. सेंट्रल स्टेशन हे शहरातील सर्वात महत्वाचे आणि व्यस्त स्थानक आहे. हे स्टेशन शहरातील सर्वात जुने स्टेशन आहे, ज्यामधून मोठ्या संख्येने गाड्या जातात.

यापूर्वी मध्यवर्ती स्थानक व्यस्ततेच्या आधारावर बांधण्यात आले होते आणि ते शहरातील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे. एका शहरातील सर्वात वर्दळीच्या स्थानकाला सेंट्रल हे नाव देण्यात आले आहे. परंतु याचा अर्थ असा नाही सगळ्याच मध्यवर्ती किंवा व्यस्त स्थानकाला सेंट्रल नाव दिले जाते.

जर आपण दिल्लीबद्दलच बोललो तर दिल्लीमध्ये अनेक स्थानके आहेत आणि नवी दिल्ली स्टेशन हे सर्वात व्यस्त स्थानक आहे. दिल्लीत दुसरे कोणतेही मध्यवर्ती स्थानक नाही.

महत्वाच्या स्टेशनला सेंट्रल म्हणतात मग टर्मिनल म्हणजे काय?

टर्मिनल म्हणजे असे स्थानक जिथून पुढे जाण्यासाठी गाड्यांचा कोणताही ट्रॅक नाही, म्हणजे तिथे गाड्या आल्या, तरी पुढच्या प्रवासासाठी ज्या दिशेने त्या आल्या आहेत त्याच दिशेने त्यांना पर जावे लागते.