महिना अखेरीस पैसेच उरत नाहीयेत? 'या' पद्धती वापरून करा Saving

महिना अखेरीस होणारी पैशांची चणचण थांबवायचीये? तर मग तुम्ही पैशांचे नियोजन शिकायलाय हवे. कसे ते पाहा....

Updated: Sep 23, 2022, 02:08 PM IST
महिना अखेरीस पैसेच उरत नाहीयेत? 'या' पद्धती वापरून करा Saving  title=
do these things to save money

Saving Tips : पैसे कमवायला फार वेळ लागतो. पण खर्च करायला मात्र एक क्षणही पुरेसा असतो. हा तुमचाही अनुभव असेल. आपण पूर्ण महिना ठराविक रकमेसाठी मेहनत घेत असतो पण, एकदा पगार हातात आला की फक्त 10 दिवसांत तो कधी संपतो हे समजतही नाही. महिना अखेरीस होणारी पैशांची चणचण थांबवायचीये? तर मग तुम्ही पैशांचे नियोजन शिकायलाय हवे. कसे ते पाहा.... (do these things to save money)

1. बजेट बनवा (Make a Budget)
सर्वात आधी तुमच्या महिन्याभराच्या खर्चाची आकडेवारी निश्चित करा. महिन्याचा बजेट बनवताना दिवसभराचा खर्चाची नोंद तुम्हाला करता आली पाहिजे. बजेट बनवताना तुमचा खर्च कमीत कमी होईल यावर भर द्या. त्या बजेटचे नियमितपणे पालन केल्यास तुम्हाला बदल दिसू लागतील. 

2. खरेदी करण्यापूर्वी विचार करा (Think Before Buying)
कोणतीही गोष्ट खरेदी करताना ही गोष्ट गरजेची आहे का असा प्रश्न स्वत:ला विचारा. अशाच वस्तू खरेदी करा ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. वायफळ खर्च टाळा. असे केल्याने तुमचे खर्च आटोक्यात येतील. 

3. बचत करा आणि नियमित गुंतवणूक करा (Save and Invest Regularly)
पगारातील 30 टक्के रक्कम स्वत:वर खर्च करा तर 70 टक्के बचत करा किंवा गुंतवणूक करा. अशाने तुमच्याजवळ भविष्यासाठी बचत आणि नियमित गुंतवणूक करता येते.

आणखी वाचा... निरोगी नातेसंबंध कसे असावे? हे सल्ले तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरतील

4. कर्ज टाळा (Avoid Debt)
जितकं शक्य असेल तितकं कर्ज टाळा. ई-कॉमर्स सारख्या वेबसाइट आपल्याला नेहमीच वेगवेगळी प्रलोभने देत असतात अशा प्रलोभनांना बळी पडू नका. नेहमी लक्षात ठेवा... महाग वस्तूंवरच प्रलोभने असतात. 

5. सर्व खर्च आणि उत्पन्नाचा मागोवा घ्या (Track all Expenses and Income)
तुमचा खर्च कुठे होत आहे याची एक यादी तयार करा. जिथे खर्च करायची गरज नाही तिथे खर्च करणे टाळा. एकाच गोष्टीवर जास्त खर्च होत असेल तर तो खर्च करताना विचार करा. आपण करत असलेल्या खर्चांचा मागोवा घ्या.

आणखी वाचा... अबब! 'ही' आहे जगातली सर्वात उंच तरुणी; कर्तृत्वंच नाही तिची उंचीही जगात भारी