मुंबई : बऱ्याच लोकांना ही सवय असते की, ते एकदा एखादा पदार्थ बनवतात आणि नंतर सोयीनुसार खाण्यापूर्वी त्याला मायक्रोवेव्हमध्ये गरम करुन खातात. ज्यामुळे लोकांचे बऱ्यापैकी काम वाचते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की मायक्रोवेव्हमध्ये सगळ्याच वस्तु गरम करायच्या नसतात. असं केल्यास तुमच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या वस्तु गरम करायच्या नसतात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
लहान मुलांचे दूध : अनेकदा असे दिसून आले आहे की, घरांमध्ये मुलांना दिले जाणारे दूध मायक्रोवेव्हमध्येच गरम केले जाते. प्लॅस्टिकच्या बाटलीत दूध गरम केल्याने कार्सिनोजेन्सचा धोका निर्माण होतो आणि मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांचे दुध तसेच, लहान मुलांच्या दुसऱ्या कोणत्याच गोष्टी यामध्ये गरम करु नये.
चिकन : मायक्रोवेव्हमध्ये चिकन गरम तर होते, पण ते खाल्ल्याने शरीराच्या पचनसंस्थेला हानी पोहोचते. त्यामुळे चिकनमध्ये असलेल्या प्रथिनांच्या सरचनेत बदल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तेल : सध्या हिवाळ्याचा हंगाम आहे, त्यामुळे लोकांनी त्यात गोठवलेले खोबरेल तेल गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर सुरू केला आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो, मायक्रोवेव्हमध्ये तेल गरम केल्याने त्यातील चांगल्या फॅटचे बॅड फॅटमध्ये रूपांतर होते. त्यामुळे केवळ खोबरेल तेलच नाही तर मायक्रोवेव्हमध्ये कोणत्याही प्रकारचे तेल गरम करू नका.
भात : लोक भात गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरतात, परंतु यामुळे तुम्हाला विषबाधा होण्याची शक्यता आहे.
मशरूम : मायक्रोवेव्हमध्ये मशरूम गरम केल्याने त्यातील प्रथिने नष्ट होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही मशरूम बनवता तेव्हा, त्याचं वेळी सेवन करणे चांगले.