नवी दिल्ली : भाजपवर निशाणा साधत मोदी सरकारमधील बरेचशे मंत्री लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. मग निवडणूक लढवतंय तरी कोण निरहुवा यादव, सनी देओल, प्रज्ञा ठाकुर असे ट्विट काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली, पररराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, रेल्वे मंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कोळसा मंत्री निहालचंद, पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान आदी निवडणुकीच्या रिंगणात का नाही, असा सवाल शशी थरुर यांनी विचारला आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तीन दिवसांची प्रचारबंदी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवले. योगी आदित्यनाथांवर प्रचारबंदीची कारवाई केल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील मंदिरात पूजा अर्चा केली होती. त्यांचे अनुकरण करत मंदिरात भजन केले.
मोदी सरकार के विदेश मंत्री, वित्त मंत्री, रक्षा मंत्री, रेल मंत्री, पैट्रोलियम मंत्री, शिक्षा मंत्री, कोयला मंत्री, सब चुनाव नहीं लड़ रहें है; लोकसभा स्पीकर चुनाव नहीं लड़ रही है; मार्गदर्शक मंडल चुनाव नहीं लड़ रहा है. पर लड़ कौन रहा है? निरहुआ यादव , सनी देओल ,प्रज्ञा ठाकुर!
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 3, 2019
तर दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारी प्रकरणी भाजपवर टीका करत भाजप हिंदू मतांचे ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप सीपीआयचे महासचिव सिताराम येचुरी यांनी केला आहे. भोपाळमधील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केलीय.
प्रियंका गांधी वाड्रा यांच्या प्रचाससभेदरम्यान काही लहान मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी प्रियंका गांधी वाड्रा यांना राष्ट्रीय बाल अधिकार अयोगाने नोटीस बजावली. दरम्यान मी त्या मुलांना घोषणाबाजी सुरू केल्यानंतर थांबवलं होते. तसेच जे त्यांचे वैशिष्ट्य आहे ते त्यांनी हा व्हिडिओ एडिट करुन अर्धवट दाखवला आहे. मी पंतप्रधानांबाबत, असे बोलू नये आणि मी त्यांना थांबवले, मात्र तोच भाग काढून टाकण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीय प्रियंका यांनी माध्यमांना दिली.
माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी सभ्यता पाळली, मात्र केंद्रीय मंत्र्यांना डोळ्यासमोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी खालच्या पातळीवर जावून आरोप केले. मात्र यावेळी आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने २३मे नंतर किती अदृश्य हातांनी मला मदत केली हे स्पष्ट होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केले आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, निवडणूक आयोग पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचारबंदी घालण्याची शक्यता आहे. आयोगाने नोटीस पाठवून २४ तासांत आदित्यनाथांकडून उत्तर देण्यास सांगितले आहे. संभळ मतदारसंघातील प्रचारसभेत त्यांनी महाआघाडीचे उमेदवार शफिकुर्रहमान बर्क यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून निवडणूक आयोगानं योगी आदित्यनाथ यांना नोटीस पाठवली आहे.