दिग्विजय सिंह राजकारणातून घेत आहेत मर्यादित 'संन्यास'

कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह दीर्घ काळासाठी राजकारणातून विश्रांती घेत आहेत. ही विश्रांती कमीत कमी ६ महिन्यांची असणार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच दिग्वविजय सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 26, 2017, 05:26 PM IST
दिग्विजय सिंह राजकारणातून घेत आहेत मर्यादित 'संन्यास' title=

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह दीर्घ काळासाठी राजकारणातून विश्रांती घेत आहेत. ही विश्रांती कमीत कमी ६ महिन्यांची असणार आहे. कॉंग्रेस उपाअध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच दिग्विजय सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.

प्राप्त माहितीनुसार दिग्विजय सिंह नर्मदा यात्रेसाठी निघाले आहेत. दरम्यान, या कालावधीत दिग्विजय सिंह पक्षाचे महासचिव असतील पण, ते कोणताही कारभार पाहणार नाहीत. दिग्विजय सिंह हे कॉंग्रेसचे महासचिव आहेत पण, यापूर्वी ते मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. विश्रांतीवर जाण्यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी २४ अकबर रोडवरील आपल्या कार्यालयात दिग्विजय सिंह यांनी पक्षाचा कारभार कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांच्याकडे सोपवला.

दिग्विजय सिंह हे आंध्र प्रदेशचे पक्ष प्रभारीही आहेत. त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला. दिग्विजय हे ३३०० किलोमीटर नर्मदा यात्रेसाठी निघाले असून, ही यात्रा पूर्ण करण्यासाठी त्यांना ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आपली यात्रा ही राजकीय नसून आध्यात्मिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.