मुंबई : दिवाळी सारखा सण म्हटला की, अनेक कुटुंबांची पावले सोने खरेदीकडे वळतात. धनत्रयोदशीलाल सराफा बाजारात मोठी गर्दी होते. परंतु सोनं थेट खरेदी करूनच गुंतवणूक करता येते असं नाही. तर सोन्यात गुंतवणूकीच्या अनेक उत्तम योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने स्थिर परतावा मिळत राहतो. तसेच सोन्यात केलेली गुंतवणूक नेहमीच सुरक्षित असते. त्यामुळे फिजिकल गोल्ड खरेदी करण्याएवजी सोन्यात गुंतवणूकीचे अनेक पर्याय आहेत. फिजिकल गोल्डच्या तुलनेत याचा आणखी एक फायदा म्हणजे चोरीला जाण्याचे तसेच कुठे ठेवायचे याची चिंता नसते.
Gold ETF
पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजेच गोल्ड ईटीएफ होय. एका गोल्ड एटीएफ युनिट म्हणजेच १ ग्रॅम सोनं होय. तेसुद्धा १०० टक्के शुद्ध सोनं! गोल्ड ईटीएफची खरेदी आणि विक्री शेअरच्या प्रमाणे BSE आणि NSE मध्ये केली जाते. यामध्ये SIPच्या माध्यमांतून गुंतवणूक करण्याची देखील सुविधा आहे.
सॉवरेन गोल्ड बॉंड
गोल्ड बॉंड सरकार जारी करीत असते. याची सर्वात युनिक फायदा हा आहे की, यामध्ये सोन्याच्या किंमतींमधील वाढ तसेच 2.5 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज देखील मिळते. गोल्ड बॉंड मॅच्युरिटी टॅक्स फ्री असते.
डिजिटल गोल्ड
डिजिटल गोल्ड ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या गुंतवणूकीचा एक पर्याय आहे. या गोल्डला फिजिकल गोल्डप्रमाणेच वेंडरला पुन्हा विकता येते.
Gold Mutual Fund
हा सोन्यात गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड आहे. गोल्ड फंड गुंतवणूक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. परतावा देखील मिळत राहतो.
फिजिकल गोल्ड
हे सोनं आपण थेट ज्वेलर्सकडून खरेदी करतो. बहुतांश गुंतवणूकदार अशा पद्धतीच्या गुंतवणूकीला प्राधान्य देतात.