रेल्वे भरतीची परीक्षा दिली होती का? बोर्डाकडून ग्रुप डी ची Answer Key जारी

RRB गट डी भरती परीक्षेची answer key आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

Updated: Oct 14, 2022, 06:23 PM IST
रेल्वे भरतीची परीक्षा दिली होती का? बोर्डाकडून ग्रुप डी ची Answer Key जारी title=
Did you take the railway recruitment exam Group D Answer Key Released nz

नवी दिल्ली: RRB Group D Answer Key 2022: रेल्वे भर्ती मंडळांनी (Railway Recruitment Boards) RRB गट डी परीक्षा 2022 संबंधी नवीन अपडेट जारी केले आहे. RRB गट डी भरती परीक्षेची answer key आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ज्या उमेदवारांनी रेल्वेच्या संगणक आधारित परीक्षेत भाग घेतला होता ते अधिकृत वेबसाइटवरून RRB गट डी answer key (RRB Group D Answer Key) डाउनलोड करू शकतात. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड उत्तरपत्रिका (Answer Paper) आणि प्रश्नपत्रिका (Question Paper) सह जारी करणार. उमेदवार वेबसाइटवर लॉगिन करुन उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात. (Did you take the railway recruitment exam Group D Answer Key Released nz)

आणखी वाचा - IRCTC ने पर्यटकांसाठी आणलं नवीन पॅकेज, जाणून घ्या काय आहे ऑफर

जे उमेदवार RRB ग्रुप D च्या answer key वर असमाधानी आहेत ते देखील answer key वर आपला आक्षेप नोंदवू शकतात. 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवार answer key वर त्यांचे आक्षेप नोंदवू शकतात. आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना फी देखील भरावी लागेल. अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करावे लागेल. पेमेंट म्हणून उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी 50 रुपये आणि बँकिंग सेवा शुल्क भरावे लागेल.

रेल्वे भरती मंडळाने सलग तीन महिने ग्रुप डी भरती परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा 17 ऑगस्ट 2022 रोजी सुरू झाली, जी 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालली. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी 1 कोटी 15 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.

आणखी वाचा - Mobile Addiction: तुमची मुलंही सतत मोबाईलमध्ये डोकावतात? अशी दूर करा ही वाईट सवय 

 

RRB ग्रुप-डी answer key वर प्राप्त झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, भर्ती बोर्ड RRB भरती परीक्षेचा निकाल जाहीर करेल. या भरती परीक्षेद्वारे, रेल्वेमध्ये गट-डीच्या 1.03 लाख पदांवर उमेदवारांची भरती केली जाईल.